Cabinet minister news : मंत्रिमंडळातून महिला मंत्र्यांची तडकाफडकी उचलबांगडी; काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Konda Surekha Out | Revanth Reddy | Telangana Cabinet : रेवंत रेड्डींचा कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून काढण्याचा निर्णय; लेकीच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील गटबाजी उघडपणे समोर.
Konda Surekha with PM Narendra Modi
Konda Surekha with PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Telangana Cabinet update : तेलंगणा काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. या वादातून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मंत्री कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून तडकाफडकी वगळले आहे. रेड्डी यांच्या या निर्णयामुळे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे.

कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून वगळण्याबाबतची शिफारस राज्यपालांकडे आधीच पाठविण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे चर्चांना उधाण आले आहे. कोंडा सुरेखा यांना मंत्रिमंडळातून हटविण्यामागे त्यांच्या लेकीची मुख्यमंत्री रेड्डी यांच्याविषयीची वादग्रस्त विधाने कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.

कोंडा सुरेखा यांच्या कन्या कोंडा सुष्मिता पटेल यांनी रेवंथ रेड्डी यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांवर टीका केली होती. पलकल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून त्यांनी रेड्डी यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. तुम्ही, तुमचे वडील आणि आजोबा आले तरी मीच पलकलची आमदार होणार, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्र्‍यांना दिले होते.

Konda Surekha with PM Narendra Modi
Eknath Shinde news : सुप्रीम कोर्टात पहिल्याच दिवशी वकिलांची सडेतोड मांडणी; सुनावणी संपताच दिल्लीत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, पक्षांतर केलं नाही...

कोंडा सुष्मिता यांनी रेड्डी आणि त्यांच्या बंधूंवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. त्यानंतर पक्षाने कोंडा सुरेखा यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली होती. त्यांच्या खुलाशानंतरच ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे. सुरेखा कोंडा या वारंगल पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. या भागात त्यांच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. २०१८ मध्ये त्यांनी टीआरएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसमधून बाहेर पडणार?

कोंडा सुष्मिता यांनी परकल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण मुख्यमंत्र्यांनी विद्यमान आमदारांनाचा आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे कोंडा सुष्मिता यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढू, असे म्हटले होते. त्यातच आता त्यांच्या आईला मंत्रि‍पदावरून हटविल्यामुळे कोंडा कुटुंब काँग्रेसला रामराम ठोकण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Konda Surekha with PM Narendra Modi
DM Medha Roopam News : महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या वेतनातून 5 लाखांची भरपाई देण्याचे हायकोर्टाचे आदेश; चुकीचा गुन्हा दाखल करणं पडलं महागात

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी डॉ. जी. चिन्ना रेड्डी यांची तेलंगणा नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदावरील नियुक्तीही रद्द केली आहे. त्यांच्याजागी गडवाल विजयलक्ष्मी यांची वर्णी लागली आहे. तसेच नेरेल्ला शारदा यांची तेलंगणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेच्या माजी खासदार जी. सुधा राणी यांची काकतीय अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (KUDA)च्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com