Congress Vs BJP Politics: भाजप आणि काँग्रेस समर्थकांत जुंपली, काँग्रेस नेते कारवाईसाठी पोलीस उपायुक्तांच्या दारी!

Aakash Chhajed; BJP attacks Congress office in the name of holding a march-भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ताळतंत्र सोडले, मोर्चाच्या आडून काँग्रेस कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न
BJP Agitation & Congress delegation
BJP Agitation & Congress delegationSarkarnama
Published on
Updated on

Akash Chhajed News: 'नॅशनल हेराल्ड' प्रकरणावरून भाजपने काँग्रेस विरोधात मोर्चा काढला होता. हा मोर्चा आता वादाचा विषय ठरला आहे. मोर्चाच्या आडून भाजपच्या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या संदर्भात काँग्रेसच्या शहर अध्य‌क्षा॓नी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच संतापले होते. भाजप हा ताळतंत्र सोडलेला आणि सत्तेचा मद चढलेला पक्ष आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजकीय आंदोलनाचा स्तर व संकेत ओलांडल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

BJP Agitation & Congress delegation
Ajit Pawar Politics: अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने भुजबळ समर्थक नाराज, काय आहे कारण?

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने नुकतेच यंग इंडिया कंपनी आणि श्रीमती सोनिया गांधी तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने २०२३ मध्ये केलेल्या चौकशीतून हे आरोपपत्र दाखल झाले आहे. याबाबत काँग्रेसकडून यापूर्वीच सुडाची कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

BJP Agitation & Congress delegation
Ajit Pawar Politics: अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने भुजबळ समर्थक नाराज, काय आहे कारण?

भाजपने या विषयावर राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. शहरात भाजपच्या युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी कोणतीही परवानगी न घेता काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यात पोलिसांशी त्यांची झटापट देखील झाली.

राजकीय आंदोलन करताना त्याचे काही संकेत निश्चित असतात. राजकीय विषयावरून झालेले आंदोलन हा व्यक्तिगत विषय नसतो. भाजपच्या नेत्यांना सत्तेचा गर्व झाला आहे. पोलिसांसह सर्व यंत्रणांना ते कस्पटा समान लेखतात. यातूनच राजकीय विषयावरील आंदोलनात व्यक्तिगत द्वेषाच्या स्तरावर नेले आहे.

काँग्रेस हा प्रदीर्घ परंपरा आणि राजकीय संस्कृती जपणारा पक्ष आहे. भाजपच्या हल्लेखोर आणि विकृत राजकारणाला उत्तर देण्याची क्षमता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र कायदा हातात घेणे किंवा राजकीय संकेत मोडीत काढण्याचा कोणताही प्रकार पक्षाच्या विचारधारेत बसत नाही. त्यामुळे या संदर्भात पोलिसांनीच कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष छाजेड यांसह ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, वसंत ठाकूर, संदीप शर्मा, स्वाती जाधव, स्वप्निल पाटील, गौरव सोनार, मुन्ना ठाकूर, जावेद इब्राहिम यांसह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर चांगलाच संताप व्यक्त केला.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com