Tribal Students News : आदिवासी विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याची मंत्र्यांची कबुली? उईकेंनी अभिजित दिपकेंना आव्हान दिले की मदत मागितली?

Ashok Uike on Tribal Schools Education : "राज्यात आतापर्यंत आदिवासी आश्रम शाळांमध्ये 584 विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित दोशी संस्थांवर कारवाई करण्याची घोषणा करण्यात आली आहे."
Tribal Development Minister Ashok Uike | Abhijeet Dipke
Tribal Development Minister Ashok Uike | Abhijeet DipkeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 18 Sep : दिल्लीत जंतर मंतर येथे "जेन झी"आं दोलन गाजले. त्यानंतर महाराष्ट्रात आदिवासी युवकांनी आंदोलन सुरू केले आहे. आश्रमशाळा आणि आदिवासी शिक्षणाच्या प्रश्नांबाबत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलन जोर धरत आहे. या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री डॉ उईके सध्या नाशिक दौऱ्यावर आहे.

मंत्री उईके यांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना गडचिरोली येथील जपतलाई आश्रम शाळेत जावे, असा सल्ला दिला आहे. त्या आश्रम शाळेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. दिपके यांनी या मृत्यूची कारणे शोधून शासनाला कळवावीत, असे आवाहन मंत्री उईके यांनी केले आहे.

राज्यात आतापर्यंत आदिवासी आश्रम शाळांमध्ये 584 विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधित दोशी संस्थांवर कारवाई करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीचे दिपके यांनी राज्यातील विविध आश्रम शाळांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे.

Tribal Development Minister Ashok Uike | Abhijeet Dipke
TMC Symbol Dispute : शिवसेना-राष्ट्रवादीनंतर TMC; राहुल गांधींनी सांगितला पक्षफोडीचा 'पॅटर्न'; भाजपसह निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप

या आश्रम शाळेतील दुरावस्था आणि त्रुटी याबाबत सत्यता उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दिपके यांच्या या मोहिमेनंतर मंत्र्यांनी त्यांना गडचिरोलीच्या आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे शोधण्याचे आवाहन केले आहे. आदिवासी विकास मंत्र्यांनी दिपके यांना आव्हान दिले की या प्रश्नावर त्यांची मदत मागितली हा गोंधळात टाकणारा प्रश्न आहे.

Tribal Development Minister Ashok Uike | Abhijeet Dipke
Nashik Tree Cutting : जाहिराती दिसेनात म्हणून 55 झाडांची रातोरात कत्तल ; एजन्सीचालकासह सहा जणांना बेड्या, ‘हरित नाशिक’च्या संकल्पनेलाच तडा

आदिवासी आश्रम शाळांची स्थिती अत्यंत बिकट आहे. या संदर्भात मंत्र्यांनी आदिवासी विभागाची यंत्रणा कुचकामी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली तर दिली नाही ना? अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. आदिवासी आश्रम शाळांच्या प्रश्नावर युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी नाशिक सह विविध ठिकाणी आंदोलन केले आहे. नाशिक शहरात आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. कास क्राईम कर्मचारी संघटनाही या विषयावर आक्रमक आहेत. त्यामुळे मंत्री सध्या दबावाखाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com