जयंत पाटलांच्या आवाहनानंतर नाथाभाऊंचे आंदोलन मागे, मात्र येत्या दोन दिवसात...

Eknath Khadse : पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहेत.
Jayant Patil & Eknath Khadse Latest News
Jayant Patil & Eknath Khadse Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघात वस्तूची चोरी झाली आहे. त्यामुळे त्याचा लगेच गुन्हा दाखल करून घ्यायला हवा आणि त्याची चौकशी करायला हवी. मात्र गुन्हाच दाखल नाही तर चौकशी करणार तरी कशी? पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहेत. एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी योग्य आहे, मात्र आता या प्रकरणी न्यायालयातून आम्ही न्याय मिळविणार आहोत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले. यानंतर खडसे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी केलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. (Jayant Patil & Eknath Khadse Latest News)

Jayant Patil & Eknath Khadse Latest News
बाळासाहेबांना तुरूगांत टाकू पाहणाऱ्या भुजबळांचे गुणगाण का गात आहेत...

जिल्हा दूध संघात सव्वा कोटीच्या लोणी व दूध भुकटी अपहारप्रकरणी चेअरमन मंदाकिनी खडसे व कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी खडसे यांनी शहर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. गुरवारी (ता.१३ऑक्टोबर) रात्रभर त्यांनी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, तसेच कार्यकर्त्यांनी रात्रभर ठिय्या दिला. गुन्हा दाखल झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

जयंत पाटील यांची आंदोलनस्थळी भेट

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज जळगाव दौऱ्यावर आहे. मुंबईहून रेल्वेने जळगाव येथे दाखल होताच त्यांनी सकाळी नऊ वाजता शहर पोलिस ठाण्याबाहेर असलेल्या आंदोलन स्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा केली.

Jayant Patil & Eknath Khadse Latest News
उद्धव ठाकरेंचा 'धनुष्यबाण' गेला, आता 'मशाल'ही अडचणीत...

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, जिल्हा दूध संघात झालेल्या चोरी प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. मात्र पोलिसांवर कोणाचा तरी दबाव असून त्यामुळे ते गुन्हा दाखल करून घेत नसल्याचे दिसत आहे. मात्र या प्रकरणी आम्हाला न्यायालयात जाण्याचा मार्ग असून न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्याबाबत न्याय मिळविणार आहोत. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी याच प्रकरणी दिलेल्या तक्रार अर्जाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना पाटील म्हणाले, त्यांनी अपहाराची तक्रार केली आहे. त्यामुळे त्याची चौकशी करून गुन्हा दाखल होईल. या ठिकाणी मात्र वस्तू चोरी झाली आहे. त्याचा गुन्हा दाखल करणे आवश्‍यक आहे.

याचिका दाखल करणार : एकनाथ खडसे

गुन्हा दाखल करण्यासाठी खडसे यांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन जयंत पाटील यांच्या आवाहनानुसार मागे घेतले. याबाबत बोलताना खडसे म्हणाले, पोलिसांवर राजकीय दबाव आहे, त्यामुळे आपण या प्रकरणी येत्या दोन दिवसात चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्या माध्यमातून याचिका दाखल करून गुन्हा दाखल करण्यासाठी न्याय मिळविणार आहोत. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com