Radhakrishna Vikhe Patil : त्यांना पोरं झाली नाहीत का? विखे पाटलांची लग्नावर मिश्कील टिप्पणी (Video)

Radhakrishna Vikhe Patil urged farmers to avoid lavish weddings amid Maharashtra drought-like situation and reduce unnecessary expenses : कोविडमध्ये 10-50 लोकांमध्ये लग्न झाली, त्यांना पोरं झाली नाहीत का? दुष्काळी परिस्थितीत अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Radhakrishna Vikhe Patil appeal for simple weddings : राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी यंदा विवाह सोहळ्यांमधील अनावश्यक डामडौल आणि मोठेपणा टाळून साध्या पद्धतीने लग्नसमारंभ करावेत, असे आवाहन करताना, कोरोना काळातील साधेपणाचा दाखला दिला.

त्यांनाही पोरं झाली, अशी मिश्लिक टिप्पणी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

शिर्डी (Shirdi) मतदारसंघातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा विखे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांनी सध्याच्या पावसाच्या परिस्थितीचा संदर्भ देत विवाह सोहळ्यांवरील अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन केले.

“पाऊस कमी आहे. त्यामुळे जो मोठेपणा करता, तो यावर्षी तरी थांबवा. लग्न साध्या पद्धतीने करा,” असे विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. कोरोना काळातील साधेपणाचा दाखला देताना विखे पाटील यांनी मिश्कील टिप्पणीही केली. कोविडच्या काळात अनेकांचे विवाह साध्या पद्धतीने झाले. दहा लोकांमध्ये लग्न झाली. 50 लोकांमध्ये लग्न झाली. मात्र, त्यांना पोरं झाली नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोठ्या खर्चाशिवायही विवाह सोहळे पार पडू शकतात, असे सांगितले.

Radhakrishna Vikhe Patil
Pathardi Child Marriage : पाथर्डीत अल्पवयीन विवाहाची 4 प्रकरणे समोर; पोलिसांकडून चौकशी सुरू

विखे पाटील म्हणाले, आता पुन्हा सामुदायिक विवाहाकडे जायची वेळ आली आहे. माझी कार्यकर्त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की, आता हे सगळे डामडौल बंद करा. परिस्थिती अडचणीची आहे. उत्पन्नाचे साधन काय शिल्लक राहणार? जर पाऊस-पाणीच नाही. मोठेपणाचे सोंग आपल्याला मिरवायचं आहे ते कृपया या वर्षी तरी थांबवा, अशी माझी विनंती आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Sanjay Raut On Gyanesh Kumar : SIR वरून राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ‘ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी यंत्रणा अलर्ट’

यावेळी विखे पाटील यांनी राज्यातील दूध व्यवसायाबाबतही भाष्य केले. तत्कालीन अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे दूध भेसळीला आळा बसल्याचा दावा त्यांनी केला. दूध भेसळ कमी झाल्यामुळे बाजारातील परिस्थितीत बदल झाला असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढलेल्या दराचा दिलासा मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढू नये, यासाठी अनावश्यक खर्च टाळण्यासोबतच उपलब्ध साधनसामुग्रीचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचे विखे पाटील यांनी यावेळी अधोरेखित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com