Sanjay Raut On Gyanesh Kumar : SIR वरून राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ‘ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी यंत्रणा अलर्ट’

Sanjay Raut targets the Modi government over the SIR row and allegations surrounding CEC Gyanesh Kumar : SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगातील कथित मतभेदांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा; ‘निदर्शने रोखण्यासाठी पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र दल तैनात’ असल्याचा दावा.
Sanjay Raut On Gyanesh Kumar
Sanjay Raut On Gyanesh KumarSarkarnama
Published on: 
Updated on: 

SIR controversy Election Commission : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या SIR मतभेदाच्या भूमिकेवरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी संपूर्ण देशातील सुरक्षा यंत्रणा मोदी सरकारने अलर्ट मोडवर कार्यरत केली आहे, असा खळबळजनक दावा खासदार राऊत यांनी केला आहे.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांचे त्यांचे सहकारी निवडणूक आयुक्तांशी SIRवरून मतभेद झाल्याचे समोर आले. SIR कार्यक्रमावरून तब्बल 14 वेळा मतभेद झाल्याचे उघडकीस येताच, देशात एकच गदारोळ झाला आहे. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका उपस्थित करत, आंदोलन छेडले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena UBT) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत चार ऑक्टोबरला मोर्चा जाहीर केला आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून खासदार संजय राऊत यांनी, केंद्रातील भाजपचे मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. याबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

Sanjay Raut On Gyanesh Kumar
Nana Patole On Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना पद्मभूषण द्या म्हणाले भाजप नेते; पटोलेंचा निवडणूक आयोगावर सवाल

संजय राऊत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये, ज्ञानेश कुमार यांचा एकेरी उल्लेख करताना, हा मोदी-शाह यांच्या गळ्यातील हाडुक बनले आहे. निवडणुकीत घोटाळे करून विजय संपादन करण्याचे हत्यार ज्ञानेश कुमार आहे. त्यामुळे या गुन्हेगाराला वाचवणे हा मोदी-शाहांचा आपदधर्म बनला आहे.

Sanjay Raut On Gyanesh Kumar
Gyanesh Kumar FIR : SIR वरून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात FIRची तयारी; सुषमा अंधारेंचा मोठा दावा

कदाचित सैन्याचा वापर होईल.....

मोदी सरकार आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सर्व काम सोडून ज्ञानेश कुमार आणि त्याच्या गुन्ह्यांचे रक्षण करण्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्याचा आदेश दिला आहेत. मोदी सरकार आणि त्यांच्या नियंत्रणाखालील राज्यांच्या संपूर्ण पोलिस यंत्रणा त्याच्याविरुद्ध निदर्शने रोखण्यासाठी तैनात करण्यात आली आहे! केंद्रीय शशस्त्र बल सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, कदाचित सैन्याचा वापर होईल, अशी भीती देखील खासदार राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ज्ञानेश कुमारला जावे लागेल!

लोकशीच्या खुन्यांना वाचवण्यासाठी काय हा खटाटोप, असे म्हणत मोदी सरकारचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे, ज्ञानेश कुमारला वाचवा! पण खात्रीने सांगतो, ज्ञानेश कुमारला जावे लागेल! असेही खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com