

Ahilyanagar Disabled Scam: राज्य आणि केंद्र पुरस्कृत दिव्यांग लाभार्थींना या आर्थिक वर्षांपासून म्हणजेच, एप्रिल 2026 पासून अपंग कल्याण विभाग आर्थिक सहाय्य वितरित करणार आहे. यासाठी दिव्यांगांना अपंग कल्याण विभाग लाभार्थी दिव्यांगांना UDID-KYC करणे अनिवार्य केलं आहे.
यात अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 5 हजार 247 लाभार्थ्यांनी UDID आणि KYC केलेली नाही. तसंच बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी 11 गुन्हे दाखल झाले आहेत.
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्ती योजनेमध्ये एकूण 1 लाख 67 हजार 192 लाभार्थी आहेत. त्यातील 20 हजार 552 अपंग लाभार्थी आहेत. यातील 5 हजार 247 अपंग लाभार्थ्यांकडे UDID आणि KYC केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या अपंग लाभार्थ्यांना UDID आणि KYC तहसीलदारांकडे (Tehsildar) जमा करणे अनिवार्य आहे. या लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत UDID नोंदणी केली नाही, तर त्यांना 2500 रुपयांचा लाभ मिळणार नसल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधआरे अनुदान प्राप्त करणाऱ्या 11 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट अपंग प्रमाणपत्रांची अजून काही प्रशासकीय विभागात पडताळणी सुरू आहे. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये पारनेरमध्ये एक, राहुरी दोन आणि शेवगावमध्ये आठ, असे एकूण 11 गुन्हे वर्षभरात दाखल झाले आहेत.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने, अपंग व्यक्तींच्या हक्कासाठी अपंग कल्याण हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागा सुरू केला आहे. विशेष सहाय्य योजनेतील अपंग लाभार्थी हे अपंग कल्याण विभागाकडे वर्ग केले जात आहेत. राज्यातील सर्व अपंग व्यक्ती एका छताखाली आणले जात आहेत.
यासाठी डीबीटी पोर्टलवर नोंद असलेले सर्व अपंग लाभार्थी हे अपंग कल्याण विभागाकडे वर्ग करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्यसेवा निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील अपंग लाभार्थ्यांची प्रवर्गनिहाय माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.
त्याचबरोबर केंद्र सरकार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेतील अपंग लाभार्थ्यांची माहिती केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या अपंग कल्याण विभागाने उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.