Sandalwood Theft Gang Busted : धक्कादायक! वनमजुराला बांधून चंदन लंपास; वनखात्याची धावपळ, चोरांसाठी तीन जिल्ह्यांत सर्च ऑपरेशन

Illegal sandalwood smuggling gang: अहिल्यानगर शहरातील वन विभागाच्या कार्यालय परिसरातील चंदनाच्या झाडाच्या चोरीचा थरार समोर आला आहे.
Maharashtra forest department crackdown sandalwood theft
Maharashtra forest department crackdown sandalwood theftSarkarnama
Published on
Updated on

Sandalwood Theft Case Investigation: अहिल्यानगर शहरातील वन विभागाच्या कार्यालय परिसरातील चंदनच्या दोन झाडांची चोरी करताना, चौघां चोरांच्या टोळीने वनमुजराला झाडाला बांधून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडला.

अहिल्यानगर पोलिसांनी या चोरीचा छडा लावताना, पाच दिवसात तीन जिल्ह्यात सर्च ऑपरेशन राबवले. यात छत्रपती संभाजीनगरमधील चौघांची टोळी निष्पन्न झाली. यात दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.

मसीद नसीब गोलवाल (वय 24), शाहीदखा अलीखा कलेसे (वय 26, दोघे रा. जंजाळा, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अहिल्यानगर पोलिसांनी (Police) छत्रपती संभाजीनगरच्या अतिसंवेदनशील भागातून अटक केली आहे. असलमखा भुरेखा पठाण आणि नसीबखा मुनीरखा जोनवाल (दोघे रा. माहुली, आडगांव, सरक, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) ही दोघे पसार झाली आहेत.

वन विभागाच्या (Forest) अहिल्यानगर कार्यालयात 18 एप्रिलला रात्री दोन वाजण्याच्या सुमारास, चौघा चोरांच्या टोळीने प्रवेश केला. त्यावेळी कार्यालय परिसरात रात्रपाळीस वनमजुर रमेश पोपट शेळके (वय 58, रा. गुंडेगांव, ता. जि. अहिल्यानगर) हे कार्यरत होते. रमेश शेळके यांना या चौघा चोरांनी घेरले अन् त्यांना कार्यालय परिसरात असलेल्या अशोकाच्या झाडास बांधून ठेवले.

Maharashtra forest department crackdown sandalwood theft
Chhatrapati Shivaji Maharaj insult issue : शिवद्रोहावर दुहेरी मापदंड? छिंदमला धाक, गायकवाडांना मोकळं मैदान!

यानंतर या चोरांच्या टोळक्याने, सहाय्यक वन संरक्षक यांचे निवासस्थानाजवळील वीस हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेली. वनमजूर रमेश शेळके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.

Maharashtra forest department crackdown sandalwood theft
Govind Mokate Bypoll History : गोविंद मोकाटेंचा पोटनिवडणुकीतील विजयाचा 'ट्रॅक रेकॉर्ड भारी'; 'राहुरी'च्या निकालाची वाढली धडधड!

पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक हरिष भोये, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या पथकाने अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पाच दिवस सर्च आॅपरेशन राबवले. माहिती संकलित करताना, अजिंठा, सिल्लोड, बदनापुर, आडगांव माऊली, खामगांव, पळसे आदी भाग पिंजून काढला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेकाॅर्डवरील आरोपी मसीद गोलवाल याची टोळी या चंदन चोरीत आढळली. या टोळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ न्यायालय परिसरातून देखील चंदनाच्या झाडाची चोरी केली आहे. या टोळीतील दोघांना अटक केली असून, दोघांचा शोध सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com