Mayor Election : जो हिंदू हित की बात करेगा… म्हणतच सत्तेची किल्ली हस्तगत! महापौर-उपमहापौरांची एंट्री धडाक्यात! प्रशासक राजला रामराम!

Ahilyanagar MC: Jyoti Gade Mayor, BJP Dhananjay Jadhav Deputy Mayor Unopposed : अहिल्यानगर महापालिकेत महापौरपदावर ज्योती गाडे अन् उपमहापौरपदावर धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
Ahilyanagar Municipal Corporation 1
Ahilyanagar Municipal Corporation 1Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Corporation : जानेवारी 2024पासून अहिल्यानगर महापालिकेत असलेले प्रशासक राज अखेर आज संपुष्टात आले. महापालिकेच्या दहाव्या महापौरपदी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या ज्योती गाडे, तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरपदी विराजमान झाले.

अवघ्या 20 मिनिटात ही निवड प्रक्रिया झाली. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासातील गाजलेल्या महापौर निवडीच्या सभा पाहता, आजची सभा तशी राजकीय घडामोडींच्यादृष्टीने नीरसच झाली.

अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे या महापौरांच्या खुर्चीत विराजमान होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पण दुसरीकडे त्यांचे डोळे पाणावले होते. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिलेंची आठवणीनं त्याचं मन भरून आलं. या दृश्याने काही वेळ थोडी शांतता पसरली. पण नंतर त्यांनीच सावरून घेत सुहास्य वदनाने सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. तत्पूर्वी निवडीनंतर माध्यमांशी बोलताना, अहिल्यानगर शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील समस्या जाणून घेण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला.

या वेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपस्थित होते. महापौर ज्योती गाडे यांची मोठी बहीण तथा आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी माजी नगरसेविका शीतल जगताप यांनीही ज्योती गाडे यांची गळाभेट घेऊन अभिनंदन केलं.

Ahilyanagar Municipal Corporation 1
Drugs & Gym Jihad : लव्ह ते ड्रग्ज-जिम जिहाद, अहिल्यानगरमध्ये काय चाललंय? संग्रामभैय्यांनी ‘मिनी पाकिस्तान’चा धोका सांगत पोलिसांना सुनावलं

महापौरपदी निवड झाल्यावर माध्यमांशी बोलताना, ज्योती गाडे यांनी, त्यांचे वडील भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आशीर्वादाने या पदावर बसल्याचे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे महापौरपद मिळाल्याचे स्पष्ट करून त्यांना धन्यवाद दिले. शहरात रस्त्यांची व ड्रेनेजची कामे झाली आहेत. याअंतर्गत राहिलेल्या कामांना गती देण्यास प्राधान्य असेल तसेच प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील समस्या जाणून घेणार आहे व त्या सोडवण्यासाठीच्या उपाययोजनांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ahilyanagar Municipal Corporation 1
Sharad Pawar NCP merger : एक पाऊल मागे, दोन पुढे! विलिनीकरण थांबले तरी, ठाण्यात राष्ट्रवादीचा ‘सायलेंट स्ट्राईक’, विरोधकांची झोप उडाली

रोज पाणी देण्याचा प्रयत्न ः जाधव

उपमहापौर धनंजय जाधव यांनीही मंत्री विखे पाटील, सुजय विखे पाटील, आमदार जगताप यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शहरवासियांनी राष्ट्रवादी-भाजप युतीला भरघोस मते दिली आहेत. त्यामुळे शहरवासियांचा विश्वास जपण्यास प्राधान्य दिले जाईल. शहरात दर्जेदार रस्ते झाले आहेत. आता रोज पाणी कसे देता येईल, यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे, असे सांगितले.

जोरदार घोषणाबाजी...

भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्यासह राष्ट्रवादी-भाजप युतीचे नगरसेवक, दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार यावेळी करण्यात आला. तसेच जो हिंदू हित की बात करेगा, वही महापालिके मे राज करेगा.... अशाही घोषणा यावेळी देण्यात आल्या.

जिल्हाधिकाऱ्यांचा नगरसेवकांना सल्ला

महापालिकेद्वारे अहिल्यानगर शहरात चांगले काम होत आहे, अशी प्रतिमा नागरिकांमध्ये निर्माण करा, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मनपाचे नवे पदाधिकारी व नव्या नगरसेवकांना दिला. अनधिकृत होर्डिंग्ज व बॅनर्सविरोधात जिल्हा प्रशासन स्ट्रीक्ट आहे. त्यामुळे अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स लावणे टाळून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही डॉ. आशिया यांनी केले. अहिल्यानगर शहरात ट्रॅफिक व पार्किंग समस्या असून, जिल्हा प्रशासन त्यावर काम करीत आहे. महापालिकेचीही या विषयांतील भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे पदाधिकारी व नगरसेवकांनी त्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी आशिया यांनी म्हटले.

छत्रपतींचा झाला जयघोष


भगव्या टोप्या घालून नगरसेवक व भगवी उपरणे आणि भगवे पंचे अंगावर घेऊन नगरसेविका मनपात आल्या होत्या. मनपा आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आधी सर्वांनी अभिवादन केले. त्यानंतर मनपा सभागृहात राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन केल्यावर राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या गेल्या. जय श्रीराम...घोषणाही निनादली. दोन्ही निवडी होत असताना नगरसेविकांचे पती, मुले तसेच नगरसेवकांचे कुटुंबीयही आणि प्रभागांतील समर्थकही आवर्जून उपस्थित होते. सभागृहातील प्रेक्षक दालनातून सर्वांनी निवडीची प्रक्रिया अनुभवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com