Ahilyanagar Election: विखेंचा 'तो' निरोप अन् अहिल्यानगरमध्ये युती तुटली, शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार, 50 एबी फॉर्म तयार

Eknath Shinde Shivsena VS BJP : अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी महायुती तुटली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निरोप पाठवत तुम्ही तुमचा निर्णय घ्या, असे सांगितले आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आमच्या गेली तीन टर्म विद्यमान नगरसेवक, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि त्यांचे सहकारी प्रशांत गायकवाड यांच्या जागेवर दावा केला.
Ahilyanagar municipal election 2026
Ahilyanagar municipal election 2026Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News: अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहाता इथून एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाला निवडणुकीत तुम्ही तुमचं बघा, असा निरोप पाठवला आहे. यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना पक्षाने स्वबळाची घोषणा केली आहे.

दरम्यान, गेल्या दहा दिवसापासून चाललेल्या बैठकांमुळे आमचा वेळ वाया गेला असला तरी आम्ही तो वेळ भरून काढू, असा दावा करत 50 एबी फॉर्म तयार असल्याची माहिती एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी दिली.

अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आमच्या गेली तीन टर्म विद्यमान नगरसेवक, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि त्यांचे सहकारी प्रशांत गायकवाड यांच्या जागेवर दावा केला. तसंच माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्याही जागेवर दावा केला. ही एक प्रकारचे भाजप (BJP) आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली होती.

यावर तोडगा काढण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या काल पहाटे चारवाजेपर्यंत देखील बैठक सुरू होते पण भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सहकार्य करायला तयार नव्हते. त्यामुळे आम्हाला निर्णय प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आले असून, आता येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे आणि राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Ahilyanagar municipal election 2026
NCP News: परभणी महापालिकेत घड्याळ अन् तुतारी एकाच वेळी वाजणार! शिवसेना-भाजप युती होणार?

अनिल शिंदे म्हणाले, महायुती टिकावी यासाठी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होत्या. जागांबाबत काही अदलाबदल करण्याचेही आम्ही सुचवले होते. चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करताना आमच्या काही विद्यमान नगरसेवकांना पक्षाचा उमेदवारी फॉर्म देणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांचे निकटवर्तीय नितीन कुंकूलोळ यांनी “तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढा” असा निरोप दिला. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

महायुती आम्ही तोडलेली नाही

“महायुती आम्ही तोडलेली नाही, ती भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसनेच तोडली आहे,” असा थेट आरोप यावेळी शिंदे व भोर यांनी केला. अनिल शिंदे गेली 15 वर्षे नगरसेवक आहेत. तसेच प्रशांत गायकवाड हेही विद्यमान उमेदवार असताना, या दोघांनाही उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले प्रभाग क्रमांक 11, 12 व 15 या ठिकाणच्या जागा भाजप व राष्ट्रवादीने मुद्दाम मागितल्याने अडवणूक स्पष्ट दिसून आली, असा आरोप करण्यात आला.

Ahilyanagar municipal election 2026
Sambhaji Bhide News : भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या भिडे गुरुजींना मोठा झटका; नाराज 'शिवप्रतिष्ठान'ची तडकाफडकी मोठी घोषणा

सर्वांसाठी दरवाजे खुले

शेवटच्या टप्प्यापर्यंत, म्हणजे आज पहाटेपर्यंत चार वाजेपर्यंत चर्चा सुरू होत्या. मात्र ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय उरला नाही. आमच्याकडे 150 हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. तसेच भाजप किंवा अन्य पक्षांतून चांगले उमेदवार आले, तर त्यांचाही विचार केला जाईल,” असे शिंदे व भोर यांनी स्पष्ट केले.

संभाजी कदम म्हणाले, “भाजप व शिवसेना ही महाराष्ट्रात नैसर्गिक युती आहे. युती टिकावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. मात्र आज फोनवरून युती तुटल्याचे कळवण्यात आले. आता आगामी निवडणूक स्वबळावरच लढणार आहोत.”

Ahilyanagar municipal election 2026
Mahayuti vs MVA : ट्रेलरमध्ये ‘मविआ’ची ‘धूळधाण’ : बुरूज वाचवण्याची ठाकरे-पवारांना अखेरची संधी... महायुती पुन्हा वरचढ ठरणार?

50 एबी फॉर्म तयार

अहिल्यानगर महापालिकेच्या राजकारणात या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पक्षाकडे 50 एबी फॉर्म आलेले आहेत ते वाटप आम्ही उद्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच केडगाव मध्ये आमच्याकडे सुद्धा उमेदवार असल्यामुळे त्याची चाचणी सुद्धा होऊन आम्ही उमेदवार देणार असल्याचे ते म्हणाले.

कोतकर शिंदेंच्या संपर्कात?

ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर हे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. याबाबत अजून तरी आपल्याला स्थानिक पातळीवर कोणताही निरोप नाही. परंतु केडगावमध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार तयार आहेत तिथेही आम्ही लढत देऊ, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com