Mumbai Mayor : एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना मोठा हादरा देण्याच्या तयारीत; मुंबईच्या महापौरपदासाठी पुन्हा फोडाफोडी? फिल्डिंगही लागली

Eknath Shinde Strategy for Mumbai Mayor: भाजपकडे असलेले महापौरपद सव्वा वर्षानंतर मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून संख्याबळ वाढवण्याची रणनीती; शिवसेना ठाकरे पक्षातील नगरसेवकांना गळाला लावण्याच्या हालचाली असल्याची सूत्रांची माहिती
Eknath Shinde Mumbai Mayor Mission Tiger
Eknath Shinde Mumbai Mayor election strategySarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde Mumbai Mayor Latest Political News: मुंबई महापालिकेतील महापौरपदावरून महायुतीत पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपकडे असलेले महापौरपद पुढील सव्वा वर्षानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेला मिळावे, यासाठी नगरसेवकांचे संख्याबळ वाढवण्याची रणनीती आखली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. सध्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या (BJP) रितू तावडे महापौरपदावर, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौरपदावर आहेत. पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद भाजपकडे राहणार असून त्यानंतरच्या सव्वा वर्षासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेला महापौरपद मिळण्याचा फॉर्म्युला असल्याचे सांगितले जाते.

मात्र, पुढील टप्प्यातील महापौरपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेने आतापासूनच राजकीय तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही नगरसेवकांना आपल्या गोटात आणून महापालिकेतील संख्याबळ वाढवण्याच्या हालचालींना ‘मिशन टायगर’ असे नाव देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Eknath Shinde Mumbai Mayor Mission Tiger
RSS Mohan Bhagwat : मोहन भागवतांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी USCIRFची RSSविरोधात मोठी मागणी; राजनैतिक सन्मान न देणे अन् उच्चस्तरीय बैठका टाळा, भारत-अमेरिका संबंधांत नवा वाद

लोकसभेतील ‘ऑपरेशन’ची पुनरावृत्ती?

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही खासदारांनी एकनाथ शिंदे शिवसेनेची साथ दिली होती. त्याच धर्तीवर आता मुंबई महापालिकेतही शिवसेना ठाकरे पक्षातील नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवण्याची रणनीती आखली जात असल्याचे समजते.

महापालिकेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता भाजपकडे 88 नगरसेवक आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 28, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन नगरसेवक असल्याचे सांगितले जाते. याच संख्याबळाच्या आधारे सध्या महापौरपद भाजपकडे आहे.

Eknath Shinde Mumbai Mayor Mission Tiger
RSS Jaish Taliban Comparison : RSSला जैश-तालिबानच्या रांगेत बसवले; काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ

शिवसेना ठाकरे पक्षातील नगरसेवकांवर डोळा?

शिवसेना ठाकरे पक्षातील नगरसेवक मोठ्या संख्येने आपल्या बाजूने आल्यास एकनाथ शिंदे शिवसेनेचे महापालिकेतील संख्याबळ वाढू शकते. त्यामुळे पुढील टप्प्यात महापौरपदावर दावा अधिक मजबूत करण्याचा एकनाथ शिंदे सेनेचा प्रयत्न असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

‘मिशन टायगर’ची चर्चा

विशेष म्हणजे, ‘मिशन टायगर’ यशस्वी झाल्यास केवळ संख्याबळ वाढवण्यापुरतेच हे समीकरण मर्यादित राहणार नाही. महापौरपदाचा ठरलेला सव्वा वर्षांचा कार्यकाळ वाढवून घेण्यासाठीही भाजपवर राजकीय दबाव निर्माण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ‘मिशन टायगर’बाबत एकनाथ शिंदे शिवसेनेकडून अधिकृतपणे कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

मुंबई महापालिकेत वर्चस्वासाठी रस्सीखेच?

राज्यात महायुतीची सत्ता असली तरी मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणे भाजप आणि शिंदेसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. आशियातील सर्वांत श्रीमंत महापालिकांपैकी एक असलेल्या मुंबई महापालिकेवरील नियंत्रणाला दोन्ही पक्षांकडून मोठे राजकीय महत्त्व दिले जाते. त्यामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे पक्षातील नगरसेवकांशी संपर्क, संभाव्य पक्षप्रवेश आणि महापालिकेतील संख्याबळाची जुळवाजुळव याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com