Fake milk chemicals seized
Fake milk chemicals seizedSarkarnam

Fake milk chemicals seized : काही थेंब केमिकलचे अन् दूध तयार! पोलिसांकडून 17 लाखांचा मुद्देमाल जप्त; झिरवळ अन् फडणवीसांचे खाते आमने-सामने?

Ahilyanagar Police Seize Fake Milk Chemicals in Jamkhed, Case Filed Against Three : अहिल्यानगर पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी दूध बनवणारे केमिकल जप्त करत, मोठी कारवाई केली.
Published on

Ahilyanagar police action : मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे असलेल्या अन्न व औषध प्रशासनाचा कारभार 'लाच' प्रकरणामुळे चर्चेत आहे. यातच अहिल्यानगर पोलिसांनी जामखेड इथं मोठ्याप्रमाणात दूध बनवणारे केमिकलचा साठा जप्त करत या विभागाच्या अहिल्यानगरमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जामखेड इथं कारवाई करत, तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवत, 17 लाख 32 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागाचा कारभार आहे. अहिल्यानगर पोलिसांनी ही कारवाई करत, मंत्री झिरवळ यांच्याकडील अन्न व औषध प्रशासनाच्या खात्याच्या अहिल्यानगरमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस (Police) निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी जामखडे इथल्या फक्राबादच्या रामदास नवनाथ उबाळे याच्या दूध संकलन केंद्रावर केमिकलचा वापर करून, दूध बनवले जात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अहिल्यानगरमधील अधिकाऱ्यांना बोलावून घेत, दूध केंद्रावर छापा घातला. परंतु अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना शेवटपर्यंत छापा कोठे घातला जाणार आहे, याचा पुसटशी देखील कल्पना दिली नाही. अन् कारवाई यशस्वी केली.

दूध (Milk) संकलन केंद्रावर छापा घालत, पोलिसांनी समीर कमरुद्दीन शेख (वय 30, रा. उंबरे, ता.राहुरी), आफताब कलीम शेख (वय 28, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) आणि रामदास नवनाथ उबाळे (वय 46, रा. फक्राबाद, ता. जामखेड) या तिघांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दूध संकलन केंद्राची तपासणी केली. त्यावेळी तिथं 6 ड्रममध्ये 1198 लिटर Paraffin नावाचे केमिकल, दूध पावडर आढळले.

Fake milk chemicals seized
Balasaheb Thorat on BJP : सोलापूरकर-कोरटकर-कोश्यारींचा संदर्भ देत भाजपला 'एपस्टीन फाईल'ची टोचणी; सपकाळांसाठी थोरातांची मैदानात एन्ट्री

केमिकलचा वापर करत दूध तयार करणे, 6 ड्रममधील केमिकलपासून 24,000 लिटर दूध तयार होत असल्याचे आढळले. अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांनी सदर केमिकलची तपासणी केल्यावर, ते केमिकलपासून मानवी शरीरास घातक, असे दूध तयार होत असल्याचे लक्षात आले.

Fake milk chemicals seized
Amravati Judges Theft Case : पाच न्यायाधीशांच्या घरांवर चोरांचा धाडसी डल्ला; बच्चू कडूंचा टोला, 'हिंदूच नाही, न्यायाधीशही खतऱ्यात!', फडणवीसांना थेट सवाल

दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 2 लाख 39 हजार 600 रुपयांचे 1198 लिटर Paraffin Oil, 81 हजार 056 रुपयांचे प्लास्टिक बॅगमध्ये पांढऱ्या रंगाची 300 किलो पावडर, 12 हजार 160 रुपयांचे 320 लिटर केमिकलपासून तयार केलेले दूध, 14 लाख रुपयांचो दोन पिकअप वाहनं, असा एकूण 17 लाख 32 हजार 816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या या कारवाईनंतर जामखेड पोलिस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहितेमधील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी दिली.

मंत्री झिरवळ यांचे खाते अन् चर्चा...

दूध भेसळीची माहिती पोलिसांना मिळते. परंतु दूध, अन्न पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र खाते असून, त्यांना याची माहिती मिळत नाही, हे पोलिसांच्या कारवाईवरून समोर आलं आहे. अहिल्यानगरमधील अन्न व औषध प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत दूध भेसळीविरोधात केलेल्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे या खात्याचा कारभार आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्याने दूध भेसळीवर कारवाई केल्याने, अन्न व औषध प्रशासन खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com