Ajit Pawar Plane Accident : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपाताचा संशय, बारामतीमधील 'हे' गाव बंद राहणार

Loni Bhapkar Bandh Ajit Pawar Plane Accident : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातानंतर हा घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताची चौकशी करावी आणि संशय दूर करावा यासाठी बारामती तालुक्यातील गावाने आज बंद पुकाराला आहे.
Ajit Pawar Death News in Marathi
Ajit Pawar Death News in MarathiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : अजित पवार यांच्या विमानाला झालेला अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याबाबतची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. अपघात झाल्यानंतर सुरुवातीला कमी व्हिजिबीलीटी, धुक्याचं वातावरण असल्याने वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला नसल्याचं सांगितलं गेलं. मात्र याबाबतचा सखोल प्राथमिक अहवाल अद्यापही आलेला नाही.

विमानामध्ये असलेल्या ब्लॅकबोक्स बाबत देखील अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मध्यंतरी हा ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याचं देखील काही वृत्त समोर आली, तसेच या ब्लॅक बॉक्सला परदेशामध्ये पाठवून डाटा संकलन करण्यात येत असल्याचा देखील सांगितलं जात आहे. मात्र, रोहित पवारांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

या सर्व परिस्थितीमुळे बारामती मधील नागरिक देखील संभ्रम अवस्थेत असून तातडीने अपघातीची चौकशी करावी अशी मागणी करताना पाहायला मिळत आहेत. अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा, या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर हे गाव आज (रविवार) बंद असणार आहे.

Ajit Pawar Death News in Marathi
Mahadev Munde Case : 'वाल्मिक कराडच्या मुलांकडून आमच्या जीवाला धोका...'; मुलाला मारहाण होताच महादेव मुंडेंच्या पत्नीची पोलिसांत धाव

यासंदर्भात लोणी भापकर ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षकांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, 'अजितदादांच्या निधनाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सुरु असलेल्या बातम्या पाहता आम्हाला त्यांचा घातपात झाल्याचा संशय आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, या संदर्भात आम्ही निवदेन देखील देणार आहोत. तसेच आमच्या गावातील सर्व संघटना व ग्रामस्थ आजच्या बंदमध्ये सामील होणार आहेत.'

रोहित पवारांकडून कारवाईची मागणी

अद्याप पर्यंत कोणतीही ठोस अशी माहिती अपघाताबाबत तपास यंत्रणांकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अपघाताबाबतचे संशय दिवसेंदिवस वाढत चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार देखील सातत्याने विविध प्रश्न आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून उपस्थित करत आहेत. त्यांनी थेट केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Ajit Pawar Death News in Marathi
Dcc Bank Election : भाजपच्या धुरंधरांचे आता टार्गेट ‘डीसीसी’; पण सहकारमंत्र्यांकडील ‘ही’ दोन प्रकरणे ठरणार कळीची!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com