Balasaheb Thorat : कोण संकटात आहे, हे सर्वांना माहित ; बाळासाहेब थोरातांचा टोला...

NCP's Ashok Bhangre's first commemoration program : शरद पवारांच्या विचारांशी प्रतारणा केलेल्यांना जनता धडा शिकवेल : आमदार रोहित पवार
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Balasaheb Thorat : "शिवसेना आणि राष्ट्रवादी संकटात नाही, तर संविधान आणि लोकशाही संकटात आहे. पारावरच्या पोराला विचारले शिवसेना कोणाची आहे, तरी ते म्हणेल उद्धव ठाकरे यांची. राष्ट्रवादी कोणाची, तर शरद पवार यांची. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि न्यायाला धरून निकाल दिलेला नाही. राज्यात कोण संकटात आहे, हे सर्वांना माहित आहे", असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजप सत्ताधाऱ्यांना नाव न घेता लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक भांगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात आमदार थोरात बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार सत्यजीत तांबे, सतीश पेंदाम, सुनील भुसारा, सीताराम गायकर, उत्कर्षा रूपवते, मधुकर नवले उपस्थित होते. अशोक भांगरे यांनी विचारांची कधीच साथ सोडली नसल्याचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

Balasaheb Thorat
Crime News : 'औरंगजेब आणि संत निवृत्तीनाथांची समाधी सारखीच' अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाने तोडले अकलेचे तारे

त्यामुळे अमित भांगरे आणि सुनिता भांगरे यांनी देखील त्यांच्या विचारांची साथ सोडू नये, असा सल्ला आमदार थोरात यांनी यावेळी दिला. आमदार थोरात म्हणाले, देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. स्वातंत्र्य चळवळीत जसे एकसंघ लढलो, तसे 2024 च्या निवडणुकांत लढावे लागेल आणि तशी वेळ देखील आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी धोक्यात नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जीवनात अनेक चढउतार येतात. त्यात गुंतून पडायचे नसते. मी ज्येष्ठ असताना देखील विरोधी पक्षाच्या खुर्चीत न बसता मागील बाकावर बसतो आहे. योग्य वेळ आल्यावर संधी मिळणार आहे हे लक्षात ठेवा, असेही थोरात यांनी म्हटले. अशोक भांगरे यांचे विचार बहुजनांशी जोडलेले होते. आदिवासी, शेतकरी, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आंदोलन केली.

त्यामुळे 2019 मध्ये अकोले तालुक्यात परिवर्तन होऊ शकले. शरद पवारांच्या विचारांशी प्रतारणा केलेल्यांना जनता धडा शिकवेल. ज्यांना जनतेने निवडून दिले, ते स्वार्थीपणाने स्वतःसाठी काम करत आहेत. यावेळी त्यांना जनता धडा शिकवणार, असे आमदार रोहित पवार यावेळी म्हटले.

(Edited by Amol Sutar)

Balasaheb Thorat
Nagar Political : 'टीडीएफ'ची कार्यकारिणी 23 वर्षानंतर बंद खोलीत जाहीर ; शिक्षक संघटना आक्रमक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com