Raosaheb Danve : रावसाहेब दानवे म्हणतात आमचंही ऐकू नका अन् विरोधकांचही; पण...

Lok Sabha elections 2024 : 'मतदारांनो येणाऱ्या निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षाचे लोक येतील. पण...'
Raosaheb Danve
Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagr News : मतदारांनो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तुमच्याकडे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षाचे लोक येतील. पण मी तुम्हाला सांगतो सत्ताधाऱ्यांचही ऐकू नका, अन् विरोधकांच पण ऐकू नका. फक्त 2014 ते आतापर्यंत म्हणजे दहा वर्षात देशात झालेला बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेली प्रगती, जगात वाढलेला मान याचा एकदा जरुर विचार करा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जालना लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या पिसादेवी येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे हेही उपस्थित होते. रावसाहेब दानवे यांचे भाषण समोरच्यांसाठी कायम पर्वणीच असते. ग्रामीण बोली भाषेतील त्यांचे भाषण लोकं कान देऊन ऐकतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे मोठ्या प्रमाणात होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raosaheb Danve
Lok Sabha Election 2024 : पालघरच्या जागेवरून पडली ठिणगी; महायुतीत होणार घमासान

पिसादेवी येथे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना सत्ताधाऱ्यांचंही ऐकू नका अन् विरोधकांचही असं म्हणत थबकले. आता दानवे असं का म्हणाले याचा विचार समोर उपस्थितीत असलेले लोक करतच होते. तेव्हा दानवेंनी त्यांची उत्सूकता अधिक न ताणता मोदींच्या पंतप्रधान काळातील विकासकामांचा उल्लेख करत भाषणाला पुढे सुरूवात केली.

केंद्रात पंतप्रधान मोंदीच्या (PM Modi) नेतृत्वाखाली सरकार येण्याआधी आपल्या देशाची जगात काय प्रतिमा होती ? आणि मोदींजींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळत ती कशी बदलली याचा विचार करा. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाला मग ते पाकिस्तान, चीनचे असो की कोरोनासारख्या महाभयंकर जागतिक महामारीचे असो. मोदींजीनी देशातील प्रत्येक नागरीकांची काळजी घेतली. पाकिस्तानात एक पोते धान्यासाठी चेंगराचेंगरी होते. इकडे मोदींजीनी देशातील 80 कोटी जनतेला मोफत धान्य दिले.

कोरोनामध्ये जगभरातील लोक उपचार मिळाले नाही म्हणून दगावले. पण मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाला लस तर दिली, पण बाहेरच्या देशांनाही पुरवली. इथे समोर बसलेल्यांपैकी एक तरी अशी व्यक्ती आहे का ? ज्याने मोदींची लस घेतली नाही, हात वर करा बरं ?, असे आवाहनही दानवे यांनी यावेळी केले.

गोर-गरीब महिलांच्या आरोग्याच्या काळजीतून पंतप्रधानांनी देशातील 8 कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन त्यांची धुरातून मुक्तता केली. गावागावात, घरोघरी शौचालय बांधण्यासाठी साडेबारा हजार रुपये प्रत्येकाला दिले. जगातल्या कोणत्या देशाने असे केले ? सांगा बरं, असे म्हणत केंद्राकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहितीही दिली.

(Edited By- Ganesh Thombare)

Raosaheb Danve
Shinde Vs Thackeray : शिंदे अन् ठाकरेंचे दोन दिग्गज नेते एकत्र; यातच सामंतांचं राजकीय बॉम्ब टाकणारं वक्तव्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com