Ahmednagar Politics : निलेश लंके आमदार शिंदेबाबत बोलताना भावुक: काय आहे कारण...

Ram Shinde and Nilesh Lanke : आमदार निलेश लंके यांच्या रूपाने एक सामान्य कुटुंबातील आमदार पारनेर मतदारसंघातून निवडून आला.
Nilesh Lanke Ram Shinde
Nilesh Lanke Ram Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्ह्याच्या राजकारणात उत्तर नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व राहिल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. नगर जिल्ह्याकडे पाहिल्यास नगर जिल्हा हा साखर कारखानदारांचा आणि प्रस्थापित नेत्यांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिले जाते. जिल्ह्यामध्ये विखे, थोरात, काळे, कोल्हे, गडाख, घुले, राजळे असे एक से बढकर एक मोठे राजकीय घराणे असताना नगर जिल्ह्यामध्ये 2019 ला आमदार निलेश लंके यांच्या रूपाने एक सामान्य कुटुंबातील आमदार पारनेर मतदारसंघातून निवडून आला. त्यापूर्वी 2009 ला कर्जत-जामखेड मधून राम शिंदे भाजपकडून आमदार झाले.

याच पार्श्वभूमीवर दीपावली सणाच्या निमित्ताने आमदार लंके यांना आपले आमदार राम शिंदेंबरोबर एवढे स्नेहपूर्ण संबंध का असा प्रश्न विचारला असता आमदार लंके कैसे भाऊक झाले आणि त्यांनी यावर मनात जे आहे ते बोलून दाखवले.

Nilesh Lanke Ram Shinde
Konkan graduate Election : 'फॉर्म कसा भरायचा, मतदान कसं करायचं'; राज ठाकरेंनी घेतला मनसैनिकांचा वर्ग

सध्या दिवाळी सणाचा उत्साह असून सर्वसामान्यांबरोबरच राजकीय नेतेही या दिवाळीच्या सणांमध्ये दंग आहेत. अशात जिल्ह्यातील अनेक आमदार- खासदार यांनी दीपावली फराळाचा कार्यक्रमाचे आयोजन केलाय. त्यात आज विधानपरिषद भाजपा सदस्य राम शिंदे यांनी त्यांच्या चौंडी या गावी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास सर्वात अगोदर उपस्थिती लावली ती पारनेरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांनी!!

यात अजून एक विशेष बाब म्हणजे आमदार राम शिंदे यांनी 2024 झाली भाजप पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली आहे. आपण पक्षाचे मूळ कार्यकर्ते असून आपल्याला उमेदवारी मिळावी अशी मागणी करत त्यांनी एक प्रकारे पक्षांतर करून भाजपात आलेल्या खासदार सुजय विखे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. तर दुसरीकडे आमदार निलेश लंके यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली आहे. अशात वैयक्तिक आयुष्यात जीवनातील मित्र असलेले हे दोन आमदार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकणार का असाही प्रश्न आहे.

मात्र, याच दरम्यान आलेल्या दिवाळीच्या सण निमित्ताने राम शिंदे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला निलेश लंके यांनी सर्वात अगोदर उपस्थित लावून राम शिंदेचे असलेला स्नेह पुन्हा एकदा जाहीर प्रकट केला. यावर निलेश लंके यांना बोलते केले असता त्यांनी दिलेले उत्तर काही भावनिक असेच होते. निलेश लंके हे 2017 दरम्यान पारनेर मध्ये जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळेस शिवसेनेत असताना स्थानिक पक्ष नेतृत्वाशी झालेल्या मतभेदातून त्यांनी शिवसेनेची फारकत घेतली. मात्र असे असतानाही त्यावेळी पालकमंत्री असलेले राम शिंदे यांनी निलेश लंके यांना एक युवा कार्यकर्ता आणि होतकरू कार्यकर्ता म्हणून जी मदत केली ती अजूनही आमदार झालेले निलेश लंके विसरू शकलेले नाहीत.

याचीच आठवण आज निलेश लंके यांनी करुन देत अगदी पडत्या काळामध्ये पक्षाने मला बाजूला सारले असताना पालकमंत्री असलेले राम शिंदे यांनी मला त्यावेळेस माझ्यासाठी भरभरून मदत दिली. कोणताही पक्षीय भेदाभेद न करता त्यांनी केलेली मदत ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि म्हणून त्यांच्यासोबत माझा एक वेगळी अटॅचमेंट आहे. ते आणि माझ्या घराला कसलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. आमच्या दोघांच्या घरात कोणी साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हता. मात्र सामान्य जनतेसाठी केलेली कामे त्यांना दिलेले प्रेम आणि त्यांच्या कडून मिळालेले प्रेम यावर आम्ही दोघे राजकारणात पुढे आलो आहोत. हा दोघांतील सामान्य धागा आमच्यात स्नेह ठेवून असून तो राजकारणा पुढील असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. त्यामुळेच मधल्या काळात आम्ही वेगवेगळ्या पक्षात असलो तरीही आणि आज महायुतीच्या निमित्ताने एकत्रित असलो तरीही त्यांच्याशी असलेले स्नेहपूर्ण संबंध कायम असल्याचं गुपित आमदार निलेश लंके यांनी आज माध्यमांसमोर उघड केलं.

Nilesh Lanke Ram Shinde
Tina Dabi Diwali Pics: 'आयएएस' टीना दाबी ; पाहा त्यांचे खास फोटो !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com