Ahmednagr Politics : 'नीलेश लंके 'तुतारी' वाजवणार का?' ; खासदार विखेंनी लगावला टोला!

Sujay Vikhe On Nilesh Lankhe : 'तुतारी'तून आवाज निघतो का माहीत नाही.
Sujay Vikhe Patil : Nilesh Lankhe
Sujay Vikhe Patil : Nilesh LankheSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagr News : महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार समर्थक) आमदार नीलेश लंके हे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे. यावर भाजप खासदार सुजय विखे यांनी खोचक टिप्पणी केली आहे. 'तुतारी'तून आवाज निघतो का माहीत नाही. मात्र, हे येणाऱ्या कालावधीत स्पष्ट होईल', अशी टिप्पणी खासदार विखे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

पारनेरमधील नीलेश लंके प्रतिष्ठानने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग नगरमध्ये घेतला. या महानाट्यातील अभिनेते खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी ते सादर केले. या महानाट्याला नगरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानाट्याच्या समारोपादिवशी खासदार कोल्हे यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' नगरमधून लोकनेत्यांनी वाजवावी, असे विधान करत आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.

Sujay Vikhe Patil : Nilesh Lankhe
Chitra Wagh ON NCP : 'पवारांना या वयातही फिरावे लागते; पुढची फळी कूचकामी...' ; चित्रा वाघांचा निशाणा!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार कोल्हे यांच्या या विधानानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते पुन्हा चर्चेत आली आहेत. राजकीय विश्लेषक यावर गणिते मांडत आहेत आणि पुसत आहेत. असे असतानाच भाजप खासदार विखे यांनी यावर टिप्पणी केली आहे.

खासदार सुजय विखे म्हणाले, "कोणाला तुतारी वाजवायची, कोणाला बॅण्ड वाजवायचा, कोणाला ढोल वाजवायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मला त्याच्यात रस नाही. आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीकडून भाजप जो उमेदवार देईल, त्याचे काम करणार आहोत. हे काम प्रामाणिक आणि चांगले असणार आहे." तुतारीबाबत अगोदरच बोललो होतो. हवा तर फुंकली जाईल. पण आवाज निघतो का माहीत नाही. येणाऱ्या कालावधीत तुम्हाला कळेल,' असेहीदेखील खासदार विखे यांनी म्हटले.

खासदार विखेंनी घेतील आमदार शेळकेंची बाजू -

शरद पवार यांची मावळ येथे काल सभा झाली. या सभेपूर्वी शरद पवार यांना काही कार्यकर्त्यांनी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना दमबाजी करत आहेत, अशी तक्रार केली होती. यावर शरद पवार यांनी भर सभेतून आमदार शेळके यांना चांगलेच फटकारले. यावर खासदार विखे यांनी भाष्य करत आमदार शेळके यांची बाजू लावून धरली आहे.

खासदार विखे म्हणाले, "आमदार सुनील शेळके यांना मी ओळखतो. स्वकर्तृत्वाने निवडून येणारा माणूस आहे. चांगले काम त्या भागात आहे. जे काही आरोप-प्रत्यारोप झाले किंवा गैरसमज करून देणारे असतील किंवा लावा-लाव्या करणारे भरपूर असतात. त्यांनीच साहेबांचा (शरद पवार) गैरसमज करून दिला असेल, त्यावर हे भाष्य झाले असेल. मी नगर आणि घटना मावळमधील. याबाबत माझ्याकडे अपूर्ण माहिती आहे. परंतु सामान्य कुटुंबातील व्यक्ती लोकांच्या प्रेमाने आमदार झाला आहे. मला त्यांच्यावर गुंडागिरीचे आरोप होणे, हे मला संयुक्तिक वाटत नाही, असे खासदार विखे यांनी म्हटले.

Sujay Vikhe Patil : Nilesh Lankhe
BJP Leader : ..अन् अशा रितीने भाजपच्या एका बड्या नेत्याला मिळाली कोट्यवधींची जमीन !

खासदार सुळेंचे मानसिक तणावातून आरोप : खासदार विखे

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गोळीबार आणि धमकीबाज सरकार आहे, असा आरोप सातत्याने केला आहे. यावर खासदार विखे म्हणाले, "आरोप-प्रत्यारोप करण्यापलीकडे त्यांच्याकडे काहीच राहिलेले नाही. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) विश्लेषण केल्यावर अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्याकडे उमेदवार नाही. कोणी लढायला तयार नाही. म्हणून जी काही वाक्यरचना महाविकास आघाडीच्या नेत्याकडून येत आहे, ती मानसिक तणावातून येत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना जनता विचारात घेणार नाही". निवडणुकांना किती वेळ राहिला आहे. एका महिन्यात चित्र स्पष्ट होईल. जनतेने स्वीकारले की नाकारले, हे महिन्याभरात कळेल, असा सूचक इशारा खासदार विखे यांनी दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com