

Kolhapur Gokul : दूध उत्पादक सभासदांनी दिलेल्या कौल उधळून लावत महायुती सरकारने कोल्हापूर गोकुळची सत्ता काबीज करण्यासाठी सरकार पुरस्कृत चार संचालक नियुक्ती आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यावरून कोल्हापूरमध्ये चांगलाच संघर्ष उफाळला आहे.
न्यायालयीन लढ्याबरोबरच, कोल्हापूरकर आज रस्त्यावर उतरून हा संघर्ष करत आहेत. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या संघर्ष मोर्चाला, किसान सभेने पाठिंबा देताच, महायुती सरकारच्या कुटील डावावर हल्लाबोल चढवला आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे राज्याचे नेते सचिव डाॅ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वात दूध उत्पादक सभासदांचा, कोल्हापूरकरांचा निघालेल्या संघर्ष मोर्चाला पाठिंबा देताना, महाराष्ट्राचा 'महानंद' ब्रॅण्ड जसा 'अमूल'साठी ध्वस्त केला, तसाच गोकुळ संपवण्याचा महायुती सरकारचा कुटील डाव आहे, असा गंभीर आरोप केला.
डाॅ. अजित नवले म्हणाले, "दूध उत्पादकांनी कौल दिलेला पॅनल बाजूला सारून, सत्तेसाठी चार सदस्य सरकारमार्फत (Government) तिथे नेमण्यात आले. त्यातून संबंध निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्याचा आणि लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रकार झालेला आहे. दूध उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सतेज पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघाला आहे. त्याला किसान सभेने पाठिंबा दिला आहे. या मोर्चात किसान सभेचे हजारो कार्यकर्ते सहभागी आहे."
सरकारने यापूर्वी महाराष्ट्राचा ब्रॅण्ड 'महानंद', अशाचपद्धतीने ध्वस्त करण्याचे कुटील कारस्थान केले. 'अमूल'ला पायघड्या घालण्याचा तो भाग होता. आता 'अमूल'ला अधिक विस्तारण्यासाठी 'गोकुळ'चा बळी घेण्याचा कारस्थान या महाराष्ट्रात सुरू आहे. या कारस्थानाचा किसान सभेकडून तीव्र निषेध डाॅ. अजित नवले यांनी केला.
सरकारने दूध उत्पादकांची अस्वस्थता समजून घ्यावी. सहकारमध्ये खेळलेल्या कुटील डाव मागे घ्यावा. लोकशाही पद्धतीने निवडणूक आणलेल्या पॅनलच्या ताब्यात गोकुळ द्यावे, अशी किसान सभेची मागणी आहे. संघर्ष मोर्चाला किसान सभेचे ताकदीने पाठिंबा राहील, असेही किसान सभेचे राज्य सचिव डाॅ. अजित नवले यांनी यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.