Ashok Kharat Property: अशोक खरातनं जमवलंय मोठं घबाड! नाशिक-नगरमध्ये 30 फ्लॉट, पत्नीच्या नावे शोरुम अन्...; बेनामी जमीन खरेदीचा पर्दाफाश

Ashok Kharat Property: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरातला शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Ashok Kharat
Ashok Kharat
Published on
Updated on

Ashok Kharat Property: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरातला शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीनंतर त्याचे अनेक काळेधंदे समोर आले आहेत. त्यातच या काळ्याधंद्यांमधूनच त्यानं जी काही माया जमवली आहे ती देखील आता उघड झाली आहे. मोकळ्या जमिनींचे अनेक प्लॉट, शोरुम, बेनामी जमी खरेदी अन् बरच काही समोर आलं आहे. हळूहळू त्याच्या या सर्वच व्यवहारांचा आता पर्दाफाश होत आहे.

Ashok Kharat
Co Operative Bank Loan : राज्य सहकारी बँकेची मोठी घोषणा! 25 वर्षांपासून थकलेली कर्जे काढणार निकाली; कर्जदार संस्थांनाही मिळणार दिलासा

खरातचं घबाड काय?

  1. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादी समोर आली आहे.

  2. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात जवळपास 30 हून अधिक ठिकाणी त्यानं प्लॉटसची खरेदी केली आहे.

  3. त्याच्या या सर्व जमिनींची किंमत जवळपास 500 कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे.

  4. खरातची पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि तृप्ती यांच्या नावावर पाथर्डीत शेतजमिनी

  5. जमिनींसह सिन्नर शिर्डी रस्त्यावर हार्डवेअरचे मोठं शोरूम

  6. शिवसंकल्प हार्डवेअर दुकान पत्नीच्या नावावर हे शोरूम खरातचा मेव्हणा सांभाळतोय

  7. कोट्यावधींच्या बेनामी जमिनींसह बांधकाम व्यवसायात देखील खरातची भागीदारी असल्याची माहिती

  8. नाशिक जिल्ह्यात ७ ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि मालमत्ता

  9. मिरगावमध्ये १० कोटी रुपये खर्चून मंदिर उभारलं, ते सध्या अर्धवट अवस्थेत आहे.

  10. पाथर्डीत १५० कोटी रुपयांची जमीन, यामध्ये अनेक भूखंडांचा समावेश

  11. निफाड तालुक्यातील ओझरजवळ विमानतळाशेजारीच मोठ्या जमिनी विकत घेतल्या

  12. मिरगावात आलिशान फार्महाऊस तसंच कोट्यवधींची ४५ एक जमीन

Ashok Kharat
Rupali Chakankar Resign Demand: 'एका बलात्काऱ्याच्या घरी रांगोळी,तर दुसऱ्याचं...'; चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आणखी एका महिला नेत्यानं उचललं मोठं पाऊल

कोण आहे कॅप्टन अशोक खरात?

अशोक खरात हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव (किंवा वावीजवळील) येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे (शिवनिका संस्थान/ट्रस्ट) अध्यक्ष आहेत. ते स्वतःला 'कॅप्टन' म्हणवतात आणि मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये सुमारे २२ वर्षांची सेवा केली असून, १५४ देशांचा प्रवास केल्याचा दावा ते करतात. खरात बी.एस्सी. (गणित) पदवीधर असून, अंकशास्त्र (न्यूमरोलॉजी), कॉस्मॉलॉजी (ब्रह्मांडशास्त्र) आणि ज्योतिषशास्त्राचा तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. निवृत्तीनंतर त्यांनी मंदिर ट्रस्टची स्थापना केली आणि स्वयंघोषित ज्योतिषतज्ज्ञ म्हणून अंकशास्त्राच्या माध्यमातून भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी, उद्योजक आणि प्रभावशाली व्यक्ती त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जाऊ लागले.

Ashok Kharat
Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेतील फुटीर 5 सदस्यांची नावं उघड : राष्ट्रवादी अन् शिवसेनेला धक्का देत थेट भाजपला मतदान

खरातचं राजकीय कनेक्शन

ताज्या घडामोडींनुसार, नाशिक पोलिसांनी अशोक खरात यांना बलात्कार आणि महिलेवर अत्याचाराच्या गंभीर आरोपाखाली अटक केली आहे. एका महिलेच्या तक्रारीनुसार, भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तिचे लैंगिक शोषण केलं गेलं, तिला धमक्या दिल्या गेल्या तसंच गुंगी आणणारे पदार्थ खायला देऊन लैंगिक अत्याचार केला गेला. यानंतर पोलिसांच्या तपासात खरातच्या कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ असलेला पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. हे प्रकरण राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे ठरलं आहे, कारण त्यांचे एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, राधाकृष्ण विखे पाटील यांसारख्या नेत्यांशी संबंध असल्याचे फोटो/व्हिडिओ समोर आले आहेत. महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणाचा तपास SIT ला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com