Rupali Chakankar : खरातसोबत 36 नेत्यांचे फोटो, पण राजीनामा एकट्या रुपाली चाकणकरांचाच का? या' तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत...

Rupali Chakankar resignation Ashok Kharat case : भोंदू अशोक खरातसोबत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाला. पण सर्वाधिक फटका बसला तो रुपाली चाकणकर यांना. त्यांना त्यांची दोन्ही पदे गमवावी लागली.
Rupali Chakankar , Ashok Kharat
Rupali Chakankar, Ashok KharatSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat case : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच डजनभर राजकीय नेत्यांचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. या सर्व नेत्यांवर विरोधकांकडून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना नेते दीपक केसरकर, राष्ट्रवादी (श.प) चे जयंत पाटील अशा अनेक नेत्यांचे फोटो खरातसोबत आहे. दीपक केसरकर यांच्या मतानुसार तब्बल ३९ नेत्यांचे खरातसोबत फोटो आहेत.

मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे आहे की, केवळ कोणासोबत फोटो, व्हिडीओ आहेत म्हणून कुणी दोषी ठरत नाही. तर गुन्ह्यात सहभाग आहे का हे महत्वाचे. तसा सहभाग असेल तर कारवाई होईल असे फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की इतक्या नेत्यांचे खरातसोबत फोटो असताना कारवाई फक्त रुपाली चाकणकर यांच्यावरच का झाली? चाकणकर यांनाच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा नेमका का द्यावा लागला. तर, यामागे तीन महत्वाच्या गोष्टी कारणीभूत असल्याचं दिसतं.

Rupali Chakankar , Ashok Kharat
Ashok Kharat Case: सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील खरातच्या जाळ्यात; 10 तास चौकशी, म्हणाला, '...केलेली कृती हा विधीचाच एक भाग'

रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याचे पहिले कारण म्हणजे संवैधानिक जबाबदारी. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. या पदाचा मूळ उद्देश महिलांच्या हक्काचे रक्षण करणे, महिलांवर होणारे अत्याचार रोखणे, महिलांना योग्य तो न्याय देणे. परंतु ज्या व्यक्तीने या पदावर बसून महिलांच्या हक्कासाठी लढणे आवश्यक होते. त्याच ठिकाणी त्यांच्याच गुरुने अर्थात भोंदू खरातने शेकडो महिलांचे शोषण केल्यावर चाकणकर यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिला नव्हता.

त्यानंतर चाकणकर यांचा राजीनामा घेण्याचे दुसरे कारण सांगितले जाते ते म्हणजे, एक वर्षापूर्वी नगर जिल्ह्यातील पत्रकाराने अशोक खरातच्या विरोधात एक लेख लिहला होता, ज्यात महिलांच्या शोषणाचे वर्णन होतं. ज्यात त्या पत्रकाराने खरातवर आरोप केले होते. तेव्हा या गंभीर आरोपाची चौकशी करणे, या प्रकरणाची शहानिशा करणे, खरोखर असे काही घडले असेल तर पीडित महिलांना न्याय देणं हे महिला आयोगाचे काम होते.

परंतु महिला आयोगाने तसे न करता याउलट त्या पत्रकारालाच नोटीस पाठवली. तसेच पुरावे सादर करायला सांगितलं. त्यानंतर त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तसेच एवढ्यावरच न थांबता वृत्तपत्र बंद करण्यासाठी पोलिसांना चाकणकरांनी पत्र दिलं होतं, असा गौप्यस्फोट संबधित पत्रकाराने स्वत: केला आहे. अशोक खरातने वावी पोलिस ठाण्यात या पत्रकारावर गुन्हा दाखल केला होता. यातून एकप्रकारे महिलांच्या संरक्षणासाठी बनलेल्या आयोगानेच महिलांच्या शोषणाचा आवाज दाबल्याचे बोलले गेले.

Rupali Chakankar , Ashok Kharat
Ashok Kharat : ग्रीनलँड, म्यानमार, युगांडा...खरात फुकटात फिरला अनेक देश ; पुण्यातील व्यापाऱ्याला लावला पाच कोटींचा चुना

तसेच चाकणकर यांचा राजीनामा घेण्याचं तिसरं प्रभावी कारण ठरलं ते, त्या खरातने उभारलेल्या ईशानेश्वर मंदिर ट्रस्टच्या सदस्या होत्या. यातून खरातसोबत चाकणकर यांची जवळीक स्पष्ट झाली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना कोणताही हस्तक्षेप होता कामा नये या उद्देशाने चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात आल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com