

Ashok Kharat: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरातनं आजवर अनेकांना भविष्य पाहण्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा घातला आहे, तसंच अनेक महिलांचं लैंगिक शोषणही केलं. पण आता त्याला स्वतःचंच भविष्य काय असेल? याची जाणीव झाली आहे. कारण विशेष तपास पथकासमोर चौकशी दरम्यान त्यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुत्रांच्या हवाल्यानं माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे.
अशोक खरातवर सध्या विविध प्रकारचे १५ गुन्हे दाखल असून यांपैकी ३ प्रकरणांमध्ये एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्याचबरोबर ईडीनं देखील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी त्याच्याभोवतीचा फास आवळला आहे. त्यामुळं दिव्यशक्तीचा दावा करुन इतरांना फसवणारा अशोक खरात हा हतबल झाला असून मानसिकदृष्ट्या खचला असल्याचं दिसून येत आहे. कारण नुकतेच त्यानं एसआयटीच्या चौकशी पथकासमोर 'आपण आता इथून बाहेर पडू असं वाटत नाही, माझं मरण आता इथंच आहे' अशी प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. चौकशी पथकातील सुत्रांच्या माहितीनं माध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे.
अशोक खरात हा नाशिकमधील एक स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु असल्याचं भाषवणारा हायप्रोफाईल गुन्हेगार आहे, त्याच्या अनेक काळ्या कारनाम्यांचा पुराव्यांसह भांडाफोड झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील आजी माजी राजकारणी मंत्र्यांसह अनेक व्यापारी आणि उद्योगपतींनी देखील खरातच्या दरबारात हजेरी लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह इतर अनेक राजकीय नेत्यांचे त्याच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत. याप्रकरणात खरातच्या संस्थांशी थेट कनेक्शन समोर आल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.
दरम्यान, अशोक खरानं आपल्याकडं दिव्यशक्ती असल्याचा दावा करत आध्यात्माचा गैरफायदा घेत महिलांना जीविताची भीता दाखवत तसंच बदनामीच्या धमक्या देत त्यांचं लैंगिक शोषण केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याच्या कार्यालयातच हे शोषणाचे प्रकार घडल्याचं आणि याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या रुपातच ठोस पुरावे समोर आल्यानं त्याला कुठल्याही प्रकारची पळवाट राहिलेली नाही. सध्या या विकृत खरात प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाकडं सोपवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.