Kalpana Kharat : 'अशोक खरातने बायकोला 16 वर्षांपासून माहेरीच पाठवलेलं नाही...'; फरार कल्पनाच्या माहेरच्यांचा SIT समोर धक्कादायक खुलासा

Kalpana Kharat Absconding SIT Probe : कल्पना खरात फरार होताच एसआयटीने तिच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे. एसआयटीने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची देखील चौकशी केली. मात्र, अद्याप एसआयटीला कल्पना खरात सापडलेली नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी एसआयटीचा शोध सुरू आहे.
Kalpana Kharat Absconding SIT Probe
Kalpana Kharat, wife of Ashok Kharat, is absconding as SIT intensifies investigation into the high-profile fraud case.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 03 Apr: भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात एसआयटीने चौकशीचा फास आवळताच फरार झाली आहे. ती फरार झाल्यामुळे तिचा खरातच्या काळ्या कारानाम्यांमध्ये मोठा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कल्पना खरात फरार होताच एसआयटीने तिच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे. एसआयटीने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची देखील चौकशी केली. मात्र, अद्याप एसआयटीला कल्पना खरात सापडलेली नाही. त्यामुळे तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा शोध सुरू आहे.

ती परदेशात पळून जाऊ नये यासाठी तिच्या विरोधात लूकाऊट नोटीस काढली आहे. अशातच कल्पना खरातचा शोध शोध घेण्यासाठी एसआयटीचं पथक सिन्नर मधील पाडळी येथे कल्पनाच्या माहेरी पोहोचलं असता माहेरच्या लोकांनी एसआयटीला कल्पना बाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

Kalpana Kharat Absconding SIT Probe
Raghav Chadha Removed : 'आप'च्या कारवाईनंतर राघव चड्ढा यांची पहिली पोस्ट; 'तो' व्हिडिओ शेअर करत पुन्हा घातला थेट मुद्द्याला हात

कल्पना माहेरच्या लोकांच्या जवळपास 16 वर्षापासून संपर्कात नाही. शिवाय तिला अशोक खरात माहेरी कधीही भेटायला येऊ देत नव्हता, तिने विवाह झाल्यानंतर माहेरशी फारसा संपर्क ठेवला नव्हता. ती कधी भावालाही भेटायला आली नव्हती, अशी माहिती माहेरच्या लोकांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Kalpana Kharat Absconding SIT Probe
Ashok Kharat News: मुलाच्या एका उत्तराने अशोक खरातचा पाय आणखी खोलात; SIT चौकशीत धक्कादायक कबुली

त्यामुळे आता खरात प्रकरणात आणखी एक मोठा खळबळजनक खुलासा समोर आला असून खरात आपल्या बायकोला माहेरी का पाठवत नव्हता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, कल्पना खरातने देखील नवऱ्याच्या मदतीने शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदीत फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

Kalpana Kharat Absconding SIT Probe
Nashik Crime News: खरातनंतर नाशकात आणखी एक मोठं कांड, टॅबमध्ये आढळले 200 अश्लील VIDEO, मोठा व्यावसायिक जाळ्यात

या संदर्भात खरातचा मुलगा हर्षवर्धनची एसआयटीने चौकशी केली आहे. या जमीन खरेदी प्रकरणात कल्पना आणि तिच्या भावांचा आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासात समोल आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकची माहिती कल्पना खरातकडूनच मिळू शकते.

यासाठी एसआयटीला तिची चौकशी करायची आहे. मात्र, एसआयटीने अशोक खरातच्या बाजून चौकशीचा फास आवळताच कल्पना खरात फरार झाली आहे. त्यामुळे आता एसआयटीचं पथक तिचा शोध घेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com