Tribal Development Bharti : ST उमेदवारांना दिलासा! विरोधानंतर आश्रमशाळा चौकीदार भरतीत 37 जागा वाढल्या, सुधारित जाहिरात प्रसिद्ध

Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti : ही भरती प्रक्रिया आदिवासी विभागात होत असताना आदिवासींसाठीच एकही जागा राखीव नसल्याने विरोध झाला. आता सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti
Adivasi Vikas Vibhag Watchman BhartiAI
Published on
Updated on

Maharashtra ST quota jobs : आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा व वसतीगृहांमध्ये कायमस्वरूपी चौकीदार नियुक्त करण्यासाठी 27 एप्रिल रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, तब्बल 416 जागांसाठी जाहीर झालेल्या या भरतीत अनुसूचित जमातीसाठी (एसटी) प्रवर्गासाठी एकही जागा नसल्यामुळे या जाहिरातीला प्रचंड विरोध झाला. या जाहिरातीमुळे आदिवासी युवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती, मात्र आता थेट आदिवासी मंत्र्यांच्या आदेशानंतर सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पहिल्या जाहिरातीला विरोध झाल्यानंतर आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांनी आदिवासी बांधवांवर होणार अन्याय दूर करण्यात येईल असे सांगितले व विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन सुधारणा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आदिवासी विकास विभागाने बुधवारी (दि. 29) राज्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार (गट-ड) या संवर्गातील भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात प्रसिद्ध केली. सुधारित जाहिरातीत अनुसूचित जमाती (ST) साठी 37 जागांचा नव्याने समावेश करण्यात आला असून, आता एकूण 478 जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार असून मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचे प्रत्येकी 50 प्रश्न सोडविणे बंधनकारक असणार आहे. अमागास प्रवर्गातील परीक्षार्थींसाठी 1 हजार रुपये, तर मागासवर्गीय परीक्षार्थींसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. ज्या उमेदवारांनी 27 एप्रिलच्या जाहिरातीनुसार अर्ज केले आहेत, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti
Tribal Healthcare Scheme : गडचिरोलीमधील 1700 पुजाऱ्यांची यादी! मिळणार 15 रुपये मानधन, ‘आरोग्यदूत’ योजना समजावून घ्या...

प्रकल्पनिहाय ST साठीच्या जागा

नाशिक-9, कळवण-5, भामरागड-2, गडचिरोली-2, चंद्रपूर-4, छत्रपती संभाजीनगर-2, डहाणू-2, धुळे-3 आणि वर्धा, भंडारा, चिमूर, अकोला, धारणी, पुसद, सोलापूर, आंबेगाव येथे प्रत्येकी 1 जागा.

Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti
Tribal Development Corporation recruitment scam : आदिवासी विकासाच्या 'त्या' नोकरभरती घोटाळ्यात मोठा निर्णय; 350 कोटींचा गैरव्यवहार...

काही महत्वाचे बदल

आदिवासी विकास विभागाने सुधारित जाहिरातीत काही महत्त्वाचे बदल स्पष्ट केले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 6 ते 27 मे 2026 अशी निश्चित करण्यात आली असून, यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. एकूण 478 पदांपैकी ‘एसटी’ प्रवर्गासाठी 37 तर खुल्या प्रवर्गासाठी 116 पदे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत. याशिवाय ‘एसटी’च्या 97 वारसदारांना दक्षता समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्यात येणार असून, दिवंगत ‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 151 प्रकरणांना ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून दिलासा दिला जाणार आहे. तसेच आकृतीबंधातील यापूर्वी रद्द करण्यात आलेली पदे पुन्हा पुनरुज्जीवित होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com