Ahmednagar News: नगरमध्ये औरंगजेबाचा फोटो घेऊन तरुणांचा डान्स; व्हिडिओ व्हायरल

Viral Video : नगरमधील या प्रकारानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुणांनी डान्स केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार नगर शहरातील फकीरवाडा परिसरात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नगर शहरातील फकीरवाडा परिसरात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या मिरवणुकीत काही तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Ahmednagar News
Wrestler Protest: कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट नोकरीवर परतले; आंदोलनाचं काय होणार?

हा प्रकार रविवारी रात्री घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे नगर शहरातील वातावरण तापलं आहे. या प्रकाराची दखल प्रशासनाने घेतल्याचे सांगण्यात येत असून गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Ahmednagar News
Amol Kolhe News : 'शिरूर'च्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब,कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,''मी पुन्हा येईन....''

दरम्यान, नगरमधील या प्रकारानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले, "औरंगजेबाचा फोटो झळकवणं हे सहन केलं जाणार नाही. तर कुणी औरंगजेबाचे फोटो झळकवत असेल तर ते मान्य केलं जाणार नाही. या देशात आणि महाराष्ट्रात आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. जर कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी नाही", असं फडणवीस म्हणाले.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com