Loksabha Election 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या चौथ्या टप्प्यात 37- अहमदनगर व 38-शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सोमवार, 13 मे रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले. 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी एकूण 61 टक्के तर 38-शिर्डी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी 59 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. रोहित पवारांच्या या आरोपाला राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देत बारामतीतील पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या रोहित पवारांनी असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटले. निवडणुकीत पैशाचे वाटप झाल्याच्या प्रश्नावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तर महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) व मविआचे माजी आमदार नीलेश लंके यांच्यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जोरदार चुरस आहे. या मतदारसंघातून रिंगणात 25 उमेदवार असले तरी या दोन प्रमुख उमेदवारांसाठीच दोन्ही बाजूने बड्या राजकीय नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.