Baglan Drought Farmers Protest : बागलाण तालुका दुष्काळाने होरपळला; सत्ताधारी भाजपचे आमदार गेले तरी कुठे? शरद पवारांच्या शिलेदाराचा तहसीलदारांना घेराव!

Sanjay Chavan News: बागलाण तालुक्यात दुष्काळावरून सत्ताधारी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राजकारण तापले आहे. राज्य शासनाने घोषणा करू नये प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Baglan Drought Farmers Protest
Baglan Drought Farmers Protest sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Chavan News: बागलाण तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती तीव्र झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिके वाढल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची तक्रार आहे.

यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळी स्थिती असलेल्या भागातील पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे असताना बागलाण तालुक्यात महसूल यंत्रणा ठप्पा आहे. पाठपुरावा करू नये महसूल विभागाकडून पंचनामे झालेले नाहीत, असा दावा करत तहसीलदारांना घेरावा घालण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संजय चव्हाण आणि शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत आंदोलन केले. तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदारांना घेराव घातला. पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी केली.

सरसकट पीक पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा या मागणीसाठी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे तहसीलदार कैलास चावडे यांना घेराव घालून घालण्यात आला. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात अचानक झालेल्या या आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

माजी आमदार चव्हाण म्हणाले, तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात आतापर्यंत केवळ सुमारे ४ ते ५ दिवस पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. कांदा, मका यांसह डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, पेरू आणि ऊस या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने वेळीच गंभीर परिस्थितीची दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Baglan Drought Farmers Protest
Rajabhau Waje NASAKA Sugar Factory : शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे मिळालेच पाहिजेत ; नासाका बैठकीत खासदार वाजेंचा आक्रमक पवित्रा, घावटेंच्या अनुपस्थितीवर नाराजी

यावेळी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, कार्याध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष भारत काटके, शहर कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, साहेबराव सोनवणे माजी सरपंच राजेंद्र जाधव विनोद पाटील मयूर अहिरे विलास सोनवणे किरण शिंदे सागर मोरे स्वप्नील सोनवणे पोपटराव सोनवणे विकी महाजन पोपटराव आयरे सुभाष पाटील काळु जाधव दीपक रौंदळ केदार सोनवणे राजेंद्र सोनवणे आनंदा सोनवणे आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Baglan Drought Farmers Protest
NCP Sharad Pawar: पाऊस गायब, पाण्याचा प्रश्न गंभीर... ; माजी आमदार दीपिका चव्हाण आक्रमक, राज्य सरकारकडे मागितली हेक्टरी लाखांची मदत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com