Uddhav Thackeray Shiv Sena : 'खाऊसाहेब' म्हणत ठाकरेंनी केली होती आगपाखड; आता खासदार वाकचौरेंचा पलटवार, शिवसेना ठाकरे पक्षाला मोठे खिंडार

Shirdi MP Bhausaheb Wakchaure engineers major Shivsena UBT exodus in Ahilyanagar : उद्धव ठाकरेंच्या जहाल टीकेनंतरही काही दिवस मौन बाळगणारे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, अकोले, शिर्डी आणि कोपरगावमधील शिवसेना ठाकरेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला आहे.
Uddhav Thackeray Shiv Sena
Uddhav Thackeray Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena split : शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे सेना पक्षातील कार्यकर्त्यांच्या उद्रेकापासून वाचण्यासाठी शांत राहिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार वाकचौरे यांच्या बंडखोरीवर शिर्डीत येऊन चांगली आगपाखड केली.

अक्षरश: भाऊसाहेबांना 'खाऊसाहेब' म्हटले. यावर शांत राहिलेले खासदार वाकचौरे यांनी आता झटका दाखवत अहिल्यानगरमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना रिकामी करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश घडवून आणला आहे.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी श्रीरामपूर, नेवासा, राहुरी, अकोले, शिर्डी आणि कोपरगावमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या (Shivsena UBT) प्रमुख पदाधिकाऱ्यांचा ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घडवून आणला.

श्रीरामपूरचे (Shrirampur) शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सचिन बडदे, राधाकिशन बोरकर, राहुल रणधीर, आशिष त्रिभुवन, नेवासाचे उपजिल्हाप्रमुख हरिराम शेळके, नीरज नागरे, पंकज लांभाटे, नितीन जगताप, राहुरीमधील डॉ. अजय म्हसे, राजू गुंजाळ, विजय शिरसाट, दीपक पंडित, प्रशांत शिंदे, अकोले येथील महेंद्र धुमाळ, रामहरी तिकांडे, प्रदीप हासे, शिर्डी (राहाता) अनिल बांगरे, सोमनाथ गोरे, विजय मोहोर आणि कोपरगावचे मुकुंद सिनकर, सचिन मलिक, अशोक पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना प्रवेश केला.

Uddhav Thackeray Shiv Sena
Rahul Gandhi And Mohammad Irfan : CJPच्या आंदोलनातील इरफान कोण? राहुल गांधींनी घेतली भेट

वाकचौरेंवर शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा रोष

खासदार वाकचौरे यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार वाकचौरे बैठकीसाठी आले असतानाच, त्यांना विरोध करण्यासाठी शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे पदाधिकारी जमा झाले होते. तोफखाना पोलिसांनी हस्तक्षेप करत, या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या आक्रमक पदाधिकाऱ्यांमुळे या बैठकीला खासदार वाकचौरे यांना तीन तास उशिर झाला होता.

Uddhav Thackeray Shiv Sena
Bhausaheb Wakchaure Shirdi : खासदार वाकचौरेंविरोधात संताप! 'चप्पलांचा हार', ‘गद्दार’, 'लालची कुत्रा' म्हणत रास्ता रोको, तर विखे अन् खताळांचा थेट इशारा

अहिल्यानगर पाठोपाठ पुणे, नांदेड येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश

खासदार वाकचौरे यावर देखील शांत राहिले. परंतु आता खासदार वाकचौरे यांनी शिवसेना ठाकरे सेना पक्षाला अहिल्यानगरमध्ये मोठे खिंडार पाडले आहे. अहिल्यानगर पाठोपाठ पुणे, नांदेड येथील शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील एकनाथ शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

शिवसेनेची ताकद वाढतेय

एकनाथ शिंदे यांनी, शिवसेना ही सर्वसामान्यांची आणि विकासाला प्राधान्य देणारी संघटना आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वेच्छेने शिवसेनेत येत आहेत. जनतेचा विश्वास आणि विकासाची भूमिका हीच आमची खरी ताकद आहे, असे या पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशावर म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com