जिल्हा परिषदेत `राष्ट्रवादी`ची एकहाती सत्ता येणार!

जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीच्या विचाराचे असल्याने कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे.
Purshottam Kadlag, NCP
Purshottam Kadlag, NCPSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यात (Nashik) राष्ट्रवादीचे सर्वाधीक आमदार निवडुन आले आहेत. कळवण-सुरगाना, दिंडोरी-पेठ, ईगतपुरी-त्र्यंबक, निफाड, सिन्नर, येवला आणि देवळालीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आहेत. त्या माध्यमातून कोट्यावधींची विकासकामे सुरू आहेत. तरुण वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग (Purshottam Kadlag) यांनी व्यक्त केला.

Purshottam Kadlag, NCP
संभाजीराजेंच्या आंदोलनात नाशिककरांनी दिला सक्रीय पाठींबा!

श्री. कडलग यांनी नुकताच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तयारीसाठी दौरा केला. विविध ठिकाणी बैठका घेतल्या. यासंदर्भात ते बोलत होते. ते म्हणाले, देवळा चांदवड, नांदगाव, मालेगाव बाह्य येथे पालकमंत्री भुजबळ विशेष लक्ष ठेवुन आहेत. त्यामुळे तरुण वर्ग आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आकर्षित होत आहेत. जिल्ह्याच्या दौऱ्यात युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच का? असा प्रश्न करण्यात येत होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित दादा, सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहीत पवार, निलेश लंके, सुनिल शेळके यांच्याबाबत तसेच शरद पवार यांच्या विषयी ग्रामीण भागातील तरूणांमध्ये क्रेझ आहे. या नेत्यांमुळे प्रभावित झाल्याच्या प्रतीक्रीया व्यक्त झाल्या.

Purshottam Kadlag, NCP
राजकीय विरोधासाठी आमदारांकडून मुक्ताईनगरच्या ५ कोटींची कामांना ब्रेक!

ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडुन गेलेल्या नेत्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. जनमाणसांत या नेते, कार्यकर्त्यांबाबत अतिसय नकारात्मक भावना आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांचे कमबॅक झाले आहे. राज्यातील आजची राजकीय स्थिती विचारात घेता जिल्हा परिषद निवडणुकांत पक्षाला एकहाती सत्ता येईल असा विश्वास आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या उपस्थितीत शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातुन बुथ पातळीचे युवक मेळावे झाले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेत ८० टक्के युवकांना संधी मिळणार आहे. त्या दृष्टीकोणातुन जिल्हाभर नियोजन सुरू आहे, असेही श्री कडलग म्हणाले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com