Gayatri Bhangale : फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या पत्नीला पराभूत करणाऱ्या शरद पवारांच्या नेत्याला मोठा धक्का; 5 महिन्यांतच नगराध्यक्षपद गमावण्याची आली वेळ

Gayatri Bhangale Disqualified : अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या या पदावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गायत्री भंगाळे यांनी भाजपचे मंत्री संजय सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला होता. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी जारी केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते.
Gayatri Bhangale Bhusawal
Gayatri Bhangale addressing a public gathering in Bhusawal before her disqualification, highlighting the caste certificate controversy.Sarkarnama
Published on
Updated on

Bhusawal Nagar Parishad News, 04 May : भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी निवडणुकीवेळी सादर केलेले जातीचे प्रमाणपत्र जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीने अवैध ठरविले होते. अशातच आता त्यांचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार आता गायत्री भंगाळे यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत जात वैधतेचे प्रकरण चर्चेत आले होते.

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या या पदावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गायत्री भंगाळे यांनी भाजपचे मंत्री संजय सावकारे यांची पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव केला होता. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांनी जारी केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते.

नियमानुसार, निवडून आल्यानंतर 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असले, तरी त्यापूर्वीच त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली होती. जळगाव येथील जात पडताळणी समितीने सखोल तपासणीनंतर भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याचे नमूद करत ते अवैध ठरवले होते.

Gayatri Bhangale Bhusawal
Raja Shivaji Movie : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाबाबत ठाकरेंच्या नेत्याने थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित केली सर्वात मोठी मागणी

अशातच आता अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विषेश मागास प्रवर्ग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यांच्या आदेशाने गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध घोषित करत त्यांचं नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपद देखील रद्द करण्यात आलं आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Gayatri Bhangale Bhusawal
Ashok Kharat Shirdi case : अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात; शेतकरी फसवणूक ते ‘समता’तून फिरलेल्या काळ्या पैशाचं रहस्य उलगडणार?

या शासन निर्णयात म्हटलंय की, 'महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अनधनियम 1965 चे कलम 16 (1क) व (ब) नुसार महाराष्ट्र अनुसूनचत जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम, 2000 च्या कलम 6 (1) नुसार स्थापन केलेल्या समितीने किंवा राज्य शासनाने जात पडताळणीसाछी नमूद केलेल्या कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याने असे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर अशा नगरसेवकाचे पद असा आदेश पारित केल्याच्या दिनांकापासून रिक्त केले आहे, असे मानण्यात येईल.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com