Ration Card News: मोठी बातमी ! रेशन कार्डवर आता साडी वाटप होणार; सरकारचा निर्णय

Shinde-Fadnavis-Pawar Government : राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, रेशन दुकानात आता अन्नधान्याबरोबरच साडीही मिळणार
Ration Card
Ration CardSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : रेशनकार्डवर अन्नधान्य मिळते, हे सर्वश्रुत आहे. सरकार दरबारी दाखले किंवा कागदपत्रांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरतात. 'आनंदाचा शिधा' देखील रेशनकार्ड मार्फत वितरित केला गेला. नगरमधील भाजपचे खासदार सुजय विखे यांनी कुटुंबातर्फे साखर-डाळ देखील रेशनकार्डवरच वाटली होती. यानंतर आता रेशन कार्डधारकांना सरकारकडून साडी वाटप होणार आहे. (Big decision of ration card holders)

राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाने राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना साडी वाटपाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंत्योदय रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा साडी वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य यंत्रमाग महामंडळ ही योजना राबवत आहे. या योजनेसाठी राज्य सरकार महामंडळाला साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, साठवणूक, हमालीसाठी खर्च देणार आहे. तर 2023-24 या वर्षाकरिता महामंडळास एका साडीसाठी 355 रुपये दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ration Card
Agricultural University : कृषी विद्यापीठाने राज्यपालांना केले सेन्सॉर; काय आहे प्रकरण?

नगर जिल्ह्यात 88 हजार 37 एवढे अंत्योदय रेशन कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना पुढील दोन दिवसांत साडींचे वाटप होणार आहे. यासाठी नगर जिल्ह्याला 63 हजार 402 साड्या आल्या आहेत. राहाता, राहुरी, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यासाठी पुढील दोन दिवसांत साड्या येणार आहेत. यानंतर लगेच स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये 1 हजार 887 स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांमधून साड्यांचे वाटप होणार आहे. लोकप्रतिनिधींच्या उपस्थित साड्यांचे वाटप होणार असून, याचे नियोजन जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरू आहे.

साड्यांचा कोटा किती अन् कसा वाटप होणार ?

नगर तालुक्यासाठी 4 हजार 746, नेवासा 7 हजार 157, संगमनेर 6 हजार 386, श्रीगोंदा 8 हजार 744, पारनेर 3 हजार 638, पाथर्डी 6 हजार 267, श्रीरामपूर 5 हजार 734, राहुरी 6 हजार 152, राहाता 5 हजार 592, कोपरगाव 6 हजार 778, नगर शहर 1 हजार 701, अकोले 6 हजार 199, शेवगाव 9 हजार 758, असे साडी वाटप होणार आहे.

Edited By-Ganesh Thombare

Ration Card
Loksabha Election 2024 : नगर दक्षिण अन् शिर्डी लोकसभेसाठी जिल्हा प्रशासनाकडून वेग; २२ हजार कर्मचारी नियुक्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com