Tiger Shroff car firing case : टायगर श्रॉफच्या कारवर सात गोळ्या झाडल्या; एकाला अटक, जुहू गोळीबार प्रकरणात तपासाला वेग

Mumbai Police arrested one accused Tiger Shroff car firing case Juhu. Investigators examining CCTV footage and forensic evidence after seven rounds were reportedly fired actor car : फुटबॉल खेळून परतत असताना अभिनेत्याच्या कारला लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती; चालक आणि अन्य एक जण जखमी, पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी.
tiger shroff
tiger shroffSarkarnama
Published on: 
Updated on: 

Tiger Shroff firing news : अभिनेता टायगर श्राॅफवर यांच्या कारवर गोळीबार करणाऱ्यापैकी एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली. टायगर श्राॅफ यांच्या कारवर अगदी जवळून, दोन ते तीन फुटाच्या अंतरावरून सात गोळ्या झाडल्या. हल्लेखोर यानंतर पसार झाले.

यातील एकाला मुंबई पोलिसांनी सांताक्रुझ येथून अटक केली. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनिल पंडित याने घेतली आहे.

टायगर श्राॅफ हे मुंबईच्या (Mumbai) जुहू चौपाटी येथील पुष्पा पार्क येथून फुटबाॅल खेळून कार मधून परतीचा प्रवास करत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. हल्लेखोर हे दुचाकीवरून आले होते. त्यांच्या दोन्ही हातात पिस्तुल असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

टागयर श्राॅफ चालकाच्या बाजूच्या सिटवर बसले होते. त्यांच्या दिशेच्या बाजूने एका हल्लेखोराने गोळीबार (Crime) केला. तर दुसरा हल्लेखोर हा कारच्या समोरून गोळीबार करत होता. या हल्ल्यात टायगर श्राॅफ थोडक्यात बचावले असून, त्यांचा चालक आणि आणखी एक चाहता, असे दोघे जखमी झाला आहे.

tiger shroff
Ahilyanagar DCC Bank Election : लोकसभेपासून असलेली थोरातांची साथ सुटली? जिल्हा बँकेत लंकेंची वेगळी वाट? राम शिंदेंसोबतच्या बैठकीने चर्चेला उधाण

टायगर श्रॉफ यांच्या चालकाचे नाव फिरदोस असून, त्यांच्या हाताला गोळी लागली आहे. याशिवाय दुसरा व्यक्ती उमेश चरण याला देखील गोळी लागली आहे. या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर युवा वर्गातील असून, या हल्ल्यानंतर काही वेळेतच लॉरेन्स बिश्नोई गँगचा अनिल पंडित हा पुढे येत, हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

tiger shroff
BK Hariprasad on RSS BJP Bengaluru : RSS-BJPला बंगळुरूतून हाकलून द्या; हरिप्रसादांच्या वक्तव्याने कर्नाटकात वाद

या हल्ल्यातील एकाला सांताक्रूझ परिसरातून ताब्यात घेतले आहे. तसेच हल्ला झालेल्या परिसरातून जुहू चौपाटी ते पुष्पा पार्क परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण पोलिसांकडून तपासले जात आहे.

तपासासाठी 15 पथके तैनात

गोळीबाराच्या तपासासाठी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संशयित दाव्याच्या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत. पोलिसांकडून न्यायवैद्यक पथकाकडून महत्त्वाचे पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (डीसीपी) मोहित कुमार गर्ग यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com