chandwad bjp
chandwad bjp sarkarnama

BJP News : भाजपकडून अजित पवार, एकनाथ शिंदेंना कात्रजचा घाट; भाजपचे भूषण कासलीवाल स्वबळावर ठाम!

Ajit Pawar setback News : अहिल्यादेवी होळकरांच्या चांदवडमध्ये भाजपपुढे काँग्रेसची खेळी यशस्वी होईल का?
Published on

Nashik News : नगरपालिका निवडणुकीची घोषणा झाली. चांदवड हे अहिल्यादेवी होळकर यांचे शहर मानले जाते. त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकरांच्या चांदवडमध्ये अनेकांनी नगराध्यक्षपदासाठी बाशिंग बांधले आहे. येथे जवळपास चाळीस जण इच्छुक असल्याने उमेदवारीचा विषय डोकेदुखी ठरला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतांसाठी चांदवडी रुपयाची खणखण होण्याची चिन्हे आहेत.

या नगरपालिकेत भाजपचे (Bjp) भूषण कासलीवाल नगराध्यक्ष होते. बहुमत नसले तरी नगरसेवकांची जमवाजमव करून त्यांनी कारभार केला. विकास कामे केल्याचा त्यांचा दावा आहे. हा दावा मतदारांना किती प्रभावित करतो ही उत्सुकता आहे. भाजपला मानणारा मतदार या शहरात आहे.

chandwad bjp
Pune BJP ची महापालिकेसाठीची छुपी Strategy? Dhangekar यांचा Shinde यांना फायदा? Corporation Election

डॉ. राहुल आहेर हे चांदवड मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपने स्वबळावर निवडणुकीची तयारी केली आहे. भाजपकडे इच्छुकांचा ओढा असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष कासलीवाल यांनी केला. या स्थितीत सर्व जागांवर अनेक इच्छुक आहेत. महायुतीच्या घटक पक्षांना देण्यासाठी जागाच नाही, असे सूचक विधान कासलीवाल यांनी केले आहे.

chandwad bjp
Ambadas Danve Shivsena Vs BJP : अंबादास दानवेंनी फोडला आरोपाचा बॉम्ब; भाजपच्या माजी नगरसेवकाकडून आमदाराच्या हत्येची सुपारी? गिरीश महाजनांचा संदर्भ दिल्यानं खळबळ

एकंदरच महायुतीची राज्यभरातील स्थिती चांदवड शहरातही आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit pawar) आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना कात्रजचा घाट दाखवतील अशी मोठी शक्यता आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनीही तेवढीच जोरदार तयारी केली आहे. कोतवाल हे मात्र महाविकास महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेणार आहेत. अगदी विधानसभेला विरोधात उमेदवारी केलेल्या प्रहार संघटनेलाही बरोबर घेण्याची त्यांची भूमिका आहे.

chandwad bjp
NCP News: रुपाली ठोंबरेंकडून चाकणकरांना संपवण्याची भाषा! नेमका काय आहे वाद

माजी आमदार कोतवाल यांनी महाविकास आघाडी करण्याचे कारण देखील आहे. शहरात जवळपास तीन हजार मुस्लिम आणि दोन ते अडीच हजार मागासवर्गीय मतदार आहेत. हे दोन्ही समाज घटक भाजपचे परंपरागत विरोधक मानले जातात. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण ठरणार आहे.

chandwad bjp
BJP On Local Body Elections: 'स्थानिक'च्या निवडणुकांचा धुराळा, भाजप नेत्यांची धडधड वाढली; 'तो' मुद्दा खेळ बिघडवणार

नगराध्यक्षपद मागासवर्गीय पुरुष गटासाठी राखीव आहे. त्यामुळे मुस्लिम आणि दलित मतांची मोट बांधल्यास काँग्रेसला निवडणूक सोपी ठरण्याची शक्यता आहे. इच्छुकांनाही याची कल्पना असल्याने जवळपास 40 उमेदवारांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे.उमेदवारांच्या या भाऊ गर्दीमुळे मतदारांचा भाव देखील अचानक वधारला आहे. त्यामुळे पानिपत काळात पेशवे-मराठा ही चांदवडची नाणी प्रसिद्ध होती. चांदवडी रुपया चर्चेत असतो. यंदाच्या निवडणुकीतही रुपयांची खणखण निवडणुकीत वाजेल असे चित्र आहे.

chandwad bjp
Allegations against Pune BJP Leader : ''भाजपचा पदाधिकारी छळ करतोय'' ; PMCच्या महिला अधिकारीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com