Nashik NMC : राष्ट्रवादीला जाग आली पण उशीर झाला ; भाजपचे मच्छिंद्र सानप घोड्यावर बसले, मुंडावळ्याही बांधल्या, आता फक्त..

Nashik Municipal Corporation Standing Committee Chairman election : नाशिक महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी उद्या निवडणूक होत असून त्यापूर्वी मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
Machhindra Sanap & Mukesh Sanap
Machhindra Sanap & Mukesh SanapSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने 122 पैकी स्वबळावर ७२ जागा जिंकत बहुमत मिळवल्यानंतर बहुधा आपली गरज नाही असे समजून राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. पण त्याचवेळी शिवसेना (शिंदे गट) हुशार निघाली. भाजपसोबत सत्तेत तर आलेच शिवाय वरिष्ठ पातळीवर चर्चा करून उपमहापौरपद देखील पदरात पाडून घेतले.

भाजपचे ७२ नगरसेवक स्वबळावर निवडून आले. भाजपने महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आडके यांचे तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव जाहीर केले होते. त्यामुळे महापालिकेवर भाजप एकहाती सत्ता स्थापन करणार हे फिक्स झाले होते. मात्र शेवटच्या रात्री शिवसेनेने वरिष्ठांची चर्चा करुन असा काही गेम फिरवला की भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याची ऐनवेळी घोषणा केली. शिवाय सन्मानाने सहभागी करुन घ्यावे या अटीवर उपमहापौरपद देखील मिळवलं.

भाजपने मच्छिंद्र सानप यांना माघार घ्यायला लावून शिवसेनेच्या विलास शिंदे यांना उपमहापौरपदासाठी मतदान करा म्हणून आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावला. भाजपच्या हिमगौरी आहेर आडके या महापौर झाल्या तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौर झाले. हे बघितल्यानंतर बहुदा राष्ट्रवादीला आता जाग आली आहे.

स्थायी समिती सभापतिपदासाठी आता राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. शिवसेनेला उपमहापौरपद दिले तर आम्हालाही मित्र पक्ष या नात्याने स्थायी समतीचे सभापतिपद द्या, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीसोबत नोंदणी केलेले अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी देखील सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे स्थायी सभापतिपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मात्र राष्ट्रवादीला उशीरा जाग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण राष्ट्रवादीने आधीच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शहाणे यांना पक्षाकडून अर्ज माघार घेण्यास सांगितले जाऊ शकते. भाजपच्या मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यताच अधिक आहे.

स्थायी समितीसभापती पदासाठी आवश्यक असलेला ९ सदस्यांचा आकडा भाजपकडे आहे. भाजपला शिवसेना (शिंदे गट) च्या ४ सदस्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे एकूण १३ सदस्याचे बलाबल भाजपकडे असल्याने मच्छिंद्र सानप यांचा मार्ग एकदम मोकळा आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं तर भाजपचे मच्छिंद्र सानप घोड्यावर बसले आहे, मुंडावळ्याही बांधल्या आहेत. आता फक्त लग्न मंडपात जावून लग्न लागणं बाकी आहे असच म्हणावं लागेल.

दरम्यान उद्या (दि. २५) स्थायी समिती सभापतिपसाठी निवडणूक होणार असून भाजपकडे असलेले संख्याबळ पाहाता सानप यांच्या नावाची घोषणा आता केवळ औपचारिकता ठरणार आहे. संख्याबळ पाहाता मुकेश शहाणे यांनी निवडणूक लढवली तरी सानप यांना धोका नाही. भाजपचे ९ व शिवसेनेचे ४ असे १३ सदस्य सहलीला गेले असून ते थेट सकाळी निवडणुकीवेळी महापालिकेत हजर होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com