Pune News : नैसर्गिक आपत्ती, पिकांचे भाव दर गडगडल्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, बळीराजासमोर पुन्हा नवीन संकट उभे राहिले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागात आत्तापासूनच दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
याचवेळी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पावसाच्या आधारावर एकूण ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. परंतु, यावरून राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर सत्ताधारी आमदारांच्याच भागात दुष्काळ जाहीर केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता राज्य शासनाने आणखी १७८ तालुक्यांतील १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात पुणे, कोथरूड, हडपसर, भोसरी, चिंचवड, खडकवासला, खेड शिवापूर, उरुळी कांचन या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण खडकवासला, हडपसर, कोथरूड (Kothrud) यांसारख्या ठिकाणी दुष्काळ जाहीर केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिलिमीटरपेक्षा कमी झाले आहे, अशा ठिकाणी १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती सरकारने जाहीर केली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. (Drought)
राज्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, शिरूर, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांचादेखील समावेश आहे. मात्र, सरकारकडून दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेल्या काही तालुक्यांमध्ये पावसाची चांगली स्थिती असताना तेथे दुष्काळ कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आता या तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध सवलती लागू करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन करणे, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देणे, कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देणे, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर करणे, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे इत्यादी सवलतींचा समावेश आहे. (Farmer)
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.