

Ram Shinde election rally : भाजप नेते तथा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची भाजपचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रचार्थ जामखेड येथे झालेल्या ल जाहीर सभेत अश्लील वक्तव्य अन् इशारे करणे चांगलेच अंगलट आले होते.
याप्रकरणी सार्वजनिक शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाल होता. या गुन्ह्यातून आता त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. जी. सोनी यांनी निकाल दिला.
विधानसभा 2024 मधील निवडणुकीच्या दरम्यान कर्जत-जामखेडचे भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ दिनांक 14 नोव्हेंबर 2024ला जाहीर सभा झाली होती. या सभेत पाशा पटेल यांचे भाषण काही विधानांनी गाजले होते. या जाहीर सभेमध्ये त्यांनी हातवारे करत अश्लील इशारे आणि विधाने करत सार्वजनिक शांतता भंग होईल, असे चितावणीखोरपणाचा ठपका ठेवण्यात आला होता.
जामखेड येथील एका महिलेने (Women) याप्रकरणी पाशा पटेल यांच्याविरोधात जामखेड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होतील. पोलिसांनी यावरून गुन्ह्याची नोंद केली होती. जामखेड येथील पोलिसांनी तपास करून पाशा पटेल यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 296 व 352 या गुन्ह्यांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची जलद गतीने सुनावणी सुरू होती. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण सहा साक्षीदारांनी साक्षी नोंदवली. या सहा साक्षीदारांची उलट तपासणी पाशा पटेल यांच्यावतीने विधीज्ञ गोरक्ष पालवे यांनी घेतली. यात साक्षीदारातील मुख्य फिर्यादी व तपासी अंमलदार यांचेकडून सदरील सभेसंदर्भातल्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.
न्यायालयाने गोरक्ष पालवे यांचा युक्तिवादाची दखल घेत पाशा पटेल यांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तताचा निकाल दिला. विधीज्ञ गोरक्ष पालवे यांच्यासोबत या खटल्यावर कैलासराव शेवाळे, मिर्झा मणियार यांनी सहायक म्हणून कामकाज पाहिले.
पाशा पटेल यांनी प्रचाराच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षावर सडकून टीका केली होती. यात आक्षेपार्ह आणि असभ्य भाषेचा वापर केला, तसेच काही चुकीचे हातवारे केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. यावरून जामखेड-कर्जतमधील चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. पाशा पटेल यांच्या प्रातिनिधीक पुतळ्याला जोडे मारून महिलांनी दहन करत निषेध नोंदवला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.