Jayanath Purnekar warning : शिंदे दाम्पत्याला पक्षातून बडतर्फ करा, नाहीतर..; प्रदीप पूर्णेकर यांच्या बंधूंचा थेट एकनाथ शिंदेंना इशारा

Jayanath Purnekar urges Eknath Shinde action against Meenakshi and Rajendra Shinde amid allegations linked Thane murder case : शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे बंधू ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकाची भेट घेतल्यानंतर गंभीर आरोप केले.
Pradeep Purnekar murder case
Pradeep Purnekar murder caseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pradeep Purnekar murder case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून त्यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी गुरुवारी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ठाणे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.

या प्रकरणाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी मुख्य नेता एकनाथ शिंदे दाम्पत्याला पक्षातून बडतर्फ करावे, असे आवाहन त्यांनी केले. अन्यथा भविष्यात पक्षश्रेष्ठींवरही आरोप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जयनाथ पूर्णेकर यांनी गुरुवारी ठाणे पोलिस (Police) दलातील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक कार्यालयात येऊन तपास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयनाथ पूर्णेकर यांनी हत्येच्या तपासात समोर आलेल्या व्हिडिओंचा उल्लेख केला. तपासाच्या नावाखाली केवळ नाटक करून आमच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, ज्या मित्रांसोबत राजेंद्र शिंदे राहिले, त्याच मित्राचे घर त्यांनी उद्ध्वस्त केल्याचा आरोपही जयनाथ पूर्णेकर यांनी केला. तसेच आम्हाला न्याय मिळाला नाही, तर रान पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत त्यांनी याप्रकरणी न्यायासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

Pradeep Purnekar murder case
Pradeep Purnekar latest update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट; SIT कडून पिस्तूल अन् दोन चाकू जप्त

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येत राजेंद्र शिंदे यांची आतापर्यंत पाचवेळा चौकशी झाली आहे. तसेच या हत्येत ठाणे (Thane) गुन्हे शाखेच्या एसआयटी पथकाने एक पिस्तूल आणि दोन चाकू हस्तगत आहेत. याप्रकरणाला 23 दिवस होऊन गेले आहेत.

Pradeep Purnekar murder case
Pradeep Purnekar murder case : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: राजेंद्र शिंदे यांची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी; शस्त्रांचे गूढ कायम

या हत्येप्रकरणात मयत प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम यांनी पत्रकार परिषद घेऊन राजेंद्र व त्यांची पत्नी मीनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. राजेंद्र शिंदे आणि गुन्ह्यातील आरोपी संतोष टल्ली यांचा एकत्र फोटो, राजेंद्र शिंदे यांच्या फोटोला AI ने हेल्मेट घालून पाचवा आरोपीचा असल्याचा दावा, राजेंद्र शिंदे आणि निखिल यादव याला बंदूक देतानाचा फोटो, तर निखिल यादवला राजेंद्र शिंदे बंदूक चालवायला शिकवतोय याचा व्हिडिओ समोर आणत खळबळजनक दावे केले आहेत. तसेच ⁠युपी पोलिस दलाच्या STF ने चौकशीत नगरसेवक निवडणुकीमुळेच प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्याकडेही राम यांनी लक्ष वेधले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com