Mundhwa Land Scam: पार्थ पवारांना अजितदादांचे 3 OSD, आयुक्त अन् गुन्हे शाखेंच्या अधिकाऱ्यांची मदत? दमानियांनी धक्कादायक कागदपत्रं आणली समोर

Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन प्रकरणात 'पार्थ पवारांना कोणतीही पूर्व कल्पना नव्हती' हा दावा खोटा असल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.
Vijay Kumbhar_Anjali Damania
Vijay Kumbhar_Anjali Damania
Published on
Updated on

Mundhwa Land Scam: मुंढवा जमीन घोटाळ्यात आता आखणी धक्कादायक खुलासे झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची कागदपत्रे समोर आणली आहेत. या कागदपत्रांद्वारे त्यांनी या व्यवहाराला २०२१ पासून सुरुवात झाल्याचं म्हटलं आहे.

सुरुवातीला यामध्ये अमेडिया कंपनी आणि दिग्विजय पाटील यांचाही सहभाग नव्हता. उलट शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांनी आधीच पॉवर ऑफ अॅटर्नी घेतल्याचा दावाही यातून करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात अजित पवारांचे तीन ओएसडी, मुद्रांक विभागाचे आयुक्त अन् आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांशीही समन्वय साधण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Vijay Kumbhar_Anjali Damania
Shivsena Politics : गळती थांबेनाच! ठाकरेंचे पहिल्या फळीतले सर्वच नेते गेले शिंदे सेनेत; आता 'हा' नेता करणार भाजपत प्रवेश

अंजली दमानिया म्हणाल्या, "या प्रकरणात २५ मे २०२१ रोजी शीतल तेजवानी यांनी मूळ वतनदारांच्यावतीने पार्थ पवार यांच्या नावे मुखत्यारपत्र अर्थात पॉवर ऑफ ॲटर्नी तयार केली. या कागदपत्रावरील प्रत्येक पानावर पार्थ पवारांची सही असून शेवटी फोटोही लावलेला आहे. तसंच हे कागदपत्र कायदेशीर नोटरी केलेलं आहे. अॅड. तृत्पा ठाकूर यांनी ही कागदपत्रे आपल्याला शेअर केली आहेत. अॅड. ठाकूर या दिग्वीजय पाटील आणि शीतल तेजवानी याच्या वकील आहेत. याप्रकरणात ठाकूर आणि तेजवानी यांची चौकशी केली जात आहे पण पार्थ पवार यांची कुठेही चौकशी होत नसल्यानं नाराज असलेल्या अॅड. ठाकूर यांनी ही कागदपत्रं आमच्याशी शेअर केली असल्याचा दावाही दामानिया यांनी केला आहे. या अॅड. ठाकूर यांनी ७१ पानांची डिटेल्स पाठवले असून त्यात धक्कादायक खुलासे आहेत.

Vijay Kumbhar_Anjali Damania
Pune MahaPalika : भाजपने पाठ फिरवली, शरद पवारांचही ठरेना... अजितदादांचा काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन करून आघाडीचा प्रस्ताव

या कागदपत्रांनुसार, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अॅँड स्टॅम्प्सचे आयुक्त संतोष हिंगणे यांच्यामध्ये आणि अॅड. तृप्ता ठाकूर यांच्यामध्ये व्हॉट्सअॅपवर झालेले चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये पार्थ पवारांच्या घराच्या पत्त्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवारांचे पीए असलेल्या राम चौबे यांच्यात आणि अॅड. तृप्ता ठाकूर यांच्यामध्येही मुंढवा जमीन व्यवहाराबाबत व्हॉट्सअॅपवर चर्चा होत होती. ४ एप्रिल २०२३ पासून ही चर्चा सुरु होती. त्यामुळं अजित पवारांच्या पीएला ही बाब माहिती होती ती अजित पवारांना माहिती नव्हती असा दावा कसा केला जाऊ शकतो? असा सवालही दमानिया यांनी केला आहे.

त्यानंतर जेव्हा हे प्रकरण समोर आलं आणि त्यात गुन्हाही दाखल झाला तेव्हाही १० नोव्हेंबर २०२५ रोजी राम चौबे हे पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचल्याचा मेसेजही अॅड. तृप्ता ठाकूरांना करतात. यामध्ये जमीन व्यवहाराच्या डिमांड नोटीसची कॉपी शेअर करण्यात आली. तसंच आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी असलेल्या वाघमारे यांचा फोन क्रमांकही चौबे आणि ठाकूर यांच्या चॅटिंगमध्ये शेअर करण्यात आला होता. तसंच अजित पवारांचे आणखी एक ओएसडी ढाकणे यांच्याशी देखील अॅड. ठाकूर यांच्याशी फोनवरुन बोलणं झालं.

Vijay Kumbhar_Anjali Damania
Pune MahaPalika : भाजपने पाठ फिरवली, शरद पवारांचही ठरेना... अजितदादांचा काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन करून आघाडीचा प्रस्ताव

या कागदपत्रांसोबत अॅड. तृप्ता ठाकूर यांनी एक विशेष पत्र लिहिलं असून ते अंजली दमानिया, विजय कुंभार यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेला आणि बावधन पोलीस ठाण्याला पाठवण्यात आलं आहे. आमच्यापर्यंत ही माहिती येण्यापूर्वीच ती ठाकूर यांनी पोलिसांना दिल्याचं यावेळी दमानिया यांनी सांगितलं. त्यामुळं या व्यवहारांबाबत तीन अधिकाऱ्यांशी तसंच अजित पवारांच्या तीन ओएसडींशी उघडपणे चर्चा सुरु होती, असा दावाही दमानियांनी केला आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी बावधन पोलीस स्टेशनमध्ये पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करावा तसंच अजित पवारांचा राजीनामा घ्यावा अन्य़था पुण्यात यासंदर्भात पोलिसांना अर्ज देणार असल्याचं दामानिया यांनी सांगितलं.

म्हणजेच या व्यवहारात २०२१ पासून कुलमुखत्यारपत्र हे शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये केलं गेलं तेव्हा त्यात अमेडिया कंपनी आणि दिग्विजय पाटील यांचा सहभाग नव्हता. हे बाकीचे लोक यामध्ये नंतर आले, पण तत्पूर्वीच सगळ्या यंत्रणेची तेजवानी आणि पार्थ पवारांना साथ होती, असा खळबळजनक आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे.

Vijay Kumbhar_Anjali Damania
Ajit Pawar News: कोकाटेंच्या मंत्रिपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच : अजितदादांच्या लाडक्या आमदाराला लाल दिवा मिळणार?

ठळक मुद्दे?

  1. २५ मे २०२१: शीतल तेजवानी यांनी मूळ वतनदारांच्यावतीने पार्थ पवार यांच्या नावे मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) तयार केली. या मुखत्यारपत्राद्वारे व्यापक अधिकार देण्यात आले होते. यामध्ये जमिनीचे व्यवहार, ७/१२ नोंदी, महसूल आणि शहर सर्वेक्षण प्रकरणे, न्यायालये, प्रतिज्ञापत्रे, वकीलपत्रे, नुकसानभरपाई, भूसंपादन आणि जमीन 'निर्दोष व विक्रीयोग्य' बनवणे यांचा समावेश आहे.

  2. १ जून २०२१ : पार्थ पवार यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, भोगवटा हक्काची रक्कम स्वीकारण्याची आणि वतनदारांच्या ७/१२ नोंदी करण्याची विनंती केली.

  3. २ जून २०२१: शीतल तेजवानी यांनी असेच एक पत्र दाखल केले त्यामध्येही मजकूर तोच, फक्त नाव आणि तारीख वेगळी होती.

  4. एप्रिल २०२५ : त्याच मुंढव्यातील जमिनीवर आयटी पार्कच्या विकासासाठी अमेडिया कंपनीला आशयपत्र (LoI) जारी करण्यात आले. याच्या करारावर पार्थ पवार यांची स्वाक्षरी आहे.

  5. २०२१चे मुखत्यारपत्र आणि २०२५चा करार या दोन्हीवर एकाच नोटरीनं साक्षांकन केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com