Sushma Andhare News: 'अभ्यासाच्या अभावामुळेच कदाचित सुषमाताईंवर बेरोजगार राहण्याची वेळ...' ; भाजप आमदार विक्रम पाचपुतेंनी अंधारेंना डिवचलं

Sushma Andhare News: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सलग 12 दिवस तीव्र आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर काहीच दिवसांत सुषमा अंधारे यांनी कामगार आयुक्तालयामार्फत राबवलेल्या माथाडी निरीक्षक पदाच्या 59 जागांसाठीच्या भरती प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे. यानंतर सुषमा अंधारेंच्या नव्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती.
Vikram Pachpute On Sushma Andhare
Vikram Pachpute On Sushma Andhare Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar News: देशभरात सध्या व्होट चोरी अन् पेपरफुटी असे दोन प्रकरणांमुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे.त्यातही पेपरफुटी आणि भरती परीक्षांमधील घोटाळ्यांमुळे विद्यार्थी अन् विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकारला सळो की पळो करुन सोडलं आहे. याचदरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी आता महाराष्ट्रात कामगार आयुक्तालयामार्फत घेण्यात आलेल्या माथाडी निरीक्षक पदाच्या भरतीत मोठा गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. या आरोपांवरुन भाजप आमदारानं अंधारेंना डिवचलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी(ता.15) पत्रकार परिषद घेत कामगार आयुक्त कार्यालयाच्या गट-क परीक्षेत नागपूरच्या एकाच परीक्षा केंद्रावरून तब्बल 24 विद्यार्थी टॉपर कसे? अशी शंका उपस्थित करत सनसनाटी आरोपांचा नवा बॉम्ब टाकला आहे. तसेच त्यांनी या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या आणि निकालाच्या चौकशीची जोरदार मागणीही केली आहे.

श्रीगोंद्याचे भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंच्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी आमच्या बेरोजगार सुषमाताईंचा पुन्हा एकदा अभ्यास कमीच पडला असं खोचक टोला लगावत पाचपुते यांनी शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा आधी अभ्यास करावा असं डिवचलं आहे.

सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर आरोप केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने माथाडी निरीक्षक भरती प्रक्रिया ही एमपीएससीकडून घेण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. याच स्पष्टीकरणाचा संदर्भ देत आमदार विक्रम पाचपुते यांनी अंधारेंवर निशाणा साधला आहे.

Vikram Pachpute On Sushma Andhare
Divya Mittal political party : माजी IAS दिव्या मित्तल यांच्याकडून भाजपविरोधात उमेदवारी जाहीर; कोणत्या पक्षाकडून लढणार? केली महत्वपूर्ण घोषणा

भाजप आमदार विक्रम पाचपुते म्हणाले,सुषमाताई,तुमचा अभ्यास कमी पडतोय की, तुम्ही जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहात? खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अभ्यासाच्या अभावामुळेच कदाचित सुषमाताईंवर बेरोजगार राहण्याची वेळ आली असावी असंही त्यांनी म्हटलं आहे.पाचपुते यांनी लगावला.

सुषमाताईंनी शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा आधी अभ्यास करावा असा उपरोधिक सल्लाही विक्रम पाचपुते यांनी केला आहे. यावेळी त्यांनी कोणताही आरोप करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासावी,दिशाभूल करणारी वक्तव्ये करु नये असा इशाराही दिला आहे. आता पाचपुतेंच्या आरोपांवर अंधारे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Vikram Pachpute On Sushma Andhare
SIR Supreme Court Hearing : 'इंडिया' आघाडीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; मुख्य निवडणूक आयुक्तांसह आयोगाला कोर्टाची नोटीस!

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात सलग 12 दिवस तीव्र आंदोलन केलं होतं. या आंदोलनानंतर काहीच दिवसांत सुषमा अंधारे यांनी कामगार आयुक्तालयामार्फत राबवलेल्या माथाडी निरीक्षक पदाच्या 59 जागांसाठीच्या भरती प्रक्रियेवर शंका उपस्थित केली आहे. या परीक्षेसाठी 11 जून रोजी अर्ज भरून घेण्यात आले.तसेच 29 आणि 30 जुलैला ही परीक्षा पार पडली.या परीक्षेसाठी तब्बल 23 हजार 574 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com