Nandurbar Politics: ‘एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर तीचं खरी दिवाळी’; शिवसेनेच्या नेत्याने फोडला बॉम्ब!

Mahayuti politics News: नंदुरबारमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेनेतील मतभेद चर्चेत आले आहेत. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली.
Chandrakant Raghuwanshi backs a reunion between Uddhav Thackeray and Eknath Shinde
Chandrakant Raghuwanshi backs a reunion between Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nandurbar district politics News: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले आहेत. भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता शिवसेना ( शिंदे गटाचे) आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेल्या विधानाने राजकीय चर्चेला नवे वळण मिळाले आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे एकत्र आले पाहिजेत. ते ज्या दिवशी एकत्र येतील, तीच खरी दिवाळी ठरेल,” असे रघुवंशी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील राजकीय तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार डॉ हिना गावित यांनी गेल्या आठवड्यात भाजप स्वबळावर निवडणुका लढविणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेवर गावित कुटुंबीयांचेच वर्चस्व राहिले आहे.

माजी खासदार डॉ हिना गावित यांच्या यांच्या स्वबळाच्या भुमिकेमुळे शिवसेनेला थेट अप्रत्यक्ष आव्हान दिले आहे. त्यामुळे महायुतीतच वादाला तोंड फुटले आहे. माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात सुरू असलेल्या वादावरुन यावर शिक्कामोर्तब झाले होते.

Chandrakant Raghuwanshi backs a reunion between Uddhav Thackeray and Eknath Shinde
Gokul directors news : 'गोकुळ'मधील चार शासन नियुक्त संचालकांचे असे आहे राजकीय कनेक्शन; मंत्री, खासदार, आमदारांचे विश्वासू...

या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त बोलताना चंद्रकांत रघुवंशी यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र आले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. दोन्ही नेते एकत्र आले तर तीच खरी दिवाळी असेल, असे आमदार रघुवंशी म्हणाले. रघुवंशी यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत अधूनमधून चर्चा होत असताना, महायुतीतील शिवसेनेच्याच आमदाराने अशी इच्छा व्यक्त केल्याने याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मतभेद अधिक ठळक होण्याची शक्यता आहे. एका बाजूला हिना गावित यांनी स्वबळाची भूमिका घेतल्याने महायुतीतच दिवाळीत राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांची आतषबाजी सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत महायुतीत पडलेल्या दुफळीचा लाभ काँग्रेस आणि महाविकास आघाडी किती घेईल?, याविषयी मात्र साशंकता आहे.

Chandrakant Raghuwanshi backs a reunion between Uddhav Thackeray and Eknath Shinde
Sarnaik-Raut Political Meeting : राऊतांच्या घरी सरनाईकांची एन्ट्री, शिंदेंना देणार भेटीचा 'रिपोर्ट'! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

आमदार रघुवंशी यांनी एक प्रकारे माजी खासदार आणि भाजप नेत्या डॉ हिना गावित यांना उत्तर दिले आहे. यातून जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात चांगलीच जुपणार हे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.