Dr Amol Kolhe Politics: खासदार अमोल कोल्हे यांनी भुजबळांच्या मर्मावरच बोट ठेवले, म्हणाले, ते शरण गेले!

Chhagan Bhujbal; Dr. Kolhe said Bhujbal surrendered to corruption, treachery-सावित्रीबाई फुले सनातन्यांना शरण गेल्या असत्या तर आज समाजाला हे दिवस दिसले असते का? असा प्रश्न कोल्हे यांनी केला.
Dr Amol Kolhe & Chhagan Bhujbal
Dr Amol Kolhe & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Dr Kolhe Vs Bhujbal News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सोमवारी मंत्री भुजबळ यांच्या येवला मतदार संघात होती. यावेळी मंत्री भुजबळ यांच्या राजकीय भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले.

शिवस्वराज्य यात्रा काल येवला विधानसभा मतदारसंघात होती. यावेळी पाच तास उशीर होऊनही कार्यकर्ते आणि नागरिक वाट पाहत होते. यावेळी वेळेअभावी सगळ्यांचीच भाषणे आटोपती घेण्यात आली.

येवला मतदारसंघातून विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडे पाच ते सहा इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. या सर्व उमेदवारांनी यावेळी शरद पवार देतील, तो उमेदवार मान्य करून त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्याच नेत्यांना भाषणासाठी अल्प वेळ मिळाला.

महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांपासून तर अनेकांना भाषण करता आले नाही. मात्र या सर्वांची कसर खासदार डॉ कोल्हे यांनी भरून काढली. डॉ कोल्हे यांनी छगन भुजबळ यांचे सगळेच काढले. त्यामुळे उपस्थितांनी त्यांच्या भाषणाला प्रचंड दाद दिली.

Dr Amol Kolhe & Chhagan Bhujbal
Sanjay Raut Politics: 'काहीही केले तरी महाराष्ट्राची निवडणूक भाजपच्या हातून गेली आहे'

खासदार डॉ कोल्हे म्हणाले, पूर्वी येवल्याचे नाव घेतले की, भरजरी पैठणी डोळ्यापुढे येत होती. पैठणीवरील भरजरी नक्षीकाम दिसत होते. आता येवल्याचे नाव घेतले तर विश्वासघाताचा वास येतो. येथे आल्यावर तत्व, मूल्य, जाणिवा याला काही किंमत उरली की नाही? असा प्रश्न पडतो. बंडखोरी केलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख न घेता त्यांनी टिका केली.

ते पुढे म्हणाले, विचार करा सावित्रीबाई फुले यांनी शेण गोट्याचा मार सहन करीत स्त्री शिक्षणाचे काम पुढे नेले. महिलांना शिकवले. त्यासाठी अनंत अडचणी सोसल्या. त्यांनी जर त्याकाळी सनातन्यांनी केलेल्या छळापुढे गुडघे टेकले असते, तर आज आपल्या समाजाची स्थिती काय असती? महिलांची काय स्थिती असती?.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन जुलै २०२३ रोजी फूट पडली. त्यात कोणाचे काय असेल, त्यांनी काय भूमिका घेतली, यावर मला काही बोलायचे नाही. कारण कोणाचा ना कोणाचा हात दगडाखाली असतो. मात्र तत्वाला महत्त्व असते. समजा त्याला महत्त्व देतो.

Dr Amol Kolhe & Chhagan Bhujbal
Ahmednagar Politics : 'अकोले'त कोणाचा 'गेम' होणार? शरद पवारांचं बळ नेमकं कोणाला, पिचड की भांगरेंना?

एखाद्याचा हात दगडाखाली असल्यावर बोटं रक्तबंबाळ होत असतात. पण दगड उचलून भिरकावण्याची क्षमता असलेल्यांनी गुडघे टेकले, तर काय म्हणायचे? मग आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगता येईल का? असा गंभीर सवाल त्यांनी मंत्री भुजबळ यांचे नाव न घेता केला.

यावेळी त्यांनी गीतांजली काव्यसंग्रहातील सूर्याला पणतीन दिलेल्या प्रतिसादाची कविता संदर्भ म्हणून सांगितली. आज निष्ठा, स्वाभिमान, तत्त्व सगळी लयाला गेली. सगळीकडे अंधार पसरला आहे. मात्र तुम्ही येवलेकर आहात. तुम्ही या भ्रष्ट आणि स्वार्थाच्या अंधकारावर निष्ठेने विजय मिळवता येतो, यावर ठाम रहा.

समोर कोण आहे? किती बलाढ्य उमेदवार आहे? याचा विचार करू नका. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. अस्मितेची आणि रोजगाराची आहे. नेता, जात, धर्म यापेक्षा आपल्याला रोजगार आहे की नाही. याचा फक्त विचार करा. चार लाख कोटींचे प्रकल्प गुजरातला पळवले गेले आहेत.

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन संघर्ष करणाऱ्या महापुरुषांचा विचार डोळ्यापुढे ठेवा. त्यात आपला विजय निश्चित आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्याची क्षमता आहे. सबंध महाराष्ट्र त्यांच्याकडे अशाने पाहतो आहे. अशावेळी सगळं काही दिल्लीच्या इशाऱ्यावर गुजरातला जात असताना मोठी मोठी नेते त्यापुढे शरण गेली आहेत. हे लक्षात ठेवून अशा शरणागती पत्करलेल्या नेत्यांना धडा शिकवा, असे आवाहन त्यांनी केले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com