Chhagan Bhujbal : माझे लोक देखील सांगत होते तिकडे जाऊ, पण...भोंदूबाबा खरात प्रकरणावर छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?

Chhagan Bhujbal on Ashok Kharat case : भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची चर्चा राज्यभरात सुरु आहे. आता राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी देखील याप्रकरणी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे उघड झाल्याने राज्यभर या प्रकरणाची चर्चा होत आहे. खरातवर अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता याप्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याची कसून चौकशी होत आहे.

दरम्यान अशातच या प्रकरणावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं असून मोठा खुलासा केला आहे. माझे लोक देखील सांगत होते की, तिकडे जाऊन हात दाखवून अंकशास्त्र बघावं' पण, मी काही गेलो नाही. अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे, हे माझं मत आहे. त्यामुळे मी गेलो नाही असं भुजबळांनी सांगितलं.

दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे भोंदूबाबा खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर विचारले असता त्यावरही भुजबळांनी भाष्य केलं आहे.

Chhagan Bhujbal
Ashok Kharat Case : 'तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल', पोलिसांसमोर भोंदूबाबा अशोक खरातचा थयथयाट

भुजबळ म्हणाले, अशोक खरातकडे फार मोठ-मोठी मंडळी येत होती. रुपाली चाकणकर या पुण्याच्या आहे, त्यांना काय माहित? त्यांना सुद्धा तिकडे कोणीतरी नेलं असेल. पण राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही बंधने पाळली पाहिजेत. आपण जे काही करतो त्याचा परिणाम सामान्य लोकांवर होतो. तसेच चाकणकर नेहमी तिथे जात असल्यामुळे त्यांना विश्वस्त केले असेल, असे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal
Rupali Chakankar News: महापालिका निवडणुकीत पराभव ते महिला आयोगाच्या अध्यक्षा; अशी आहे रुपाली चाकणकरांची राजकीय कुंडली

दरम्यान चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्ष पद आहे. या पदावरुन देखील त्यांची गच्छंती केली जाणार का, असा सवाल केला असता भुजबळ म्हणाले, बाबत काय करायचे त्यासाठी पक्षश्रेष्ठी आहेत, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आहेत त्या निर्णय घेतील असं भुजबळ यांनी सांगितले. संपूर्ण चौकशी करून त्यावर निर्णय होतो, असे भुजबळांनी नमूद केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com