Chhagan Bhujbal : नाशिककरांना वाहतूक कोंडीचा त्रास ; छगन भुजबळांचा अभियंत्याला अल्टिमेट!

Chhagan Bhujbal warns engineers over traffic congestion in Nashik : नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवरून मंत्री छगन भुजबळ यांनी अभियंत्यांना थेट अल्टिमेटम देत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
Minister Chhagan Bhujbal
Minister Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Politics : नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याने बहुतांशी रस्ते बंद आहेत. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका चौकात कोंडी गंभीर विषय आहे. यासंदर्भात नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला मंत्र्यांनी धारेवर धरले आहे.

सिंहस्थ कुंभमेळामुळे शहरातील बहुतांशी रस्त्यांची कामे सुरू आहेत. कॉंक्रिटीकरणामुळे बहुतांशी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना रोज अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर नागरिकांमध्ये संताप आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले आहे. यापूर्वीही वाहतूक कोंडी होणाऱ्या द्वारका चौक आणि मुंबई नाका येथे प्रत्यक्ष हजेरी लावून त्यांनी अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्या दाखवल्या होत्या. त्यानंतर प्रशासन सक्रिय होऊन या चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कामे सुरू करण्यात आली आहेत.

Minister Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : येवला एक्सप्लोरिंग नावाचं खातं, भुजबळ काका-पुतण्याचे फोटो मॉर्फ करुन बदनामी, नेमकं प्रकरण काय?

शहराचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका चौकात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अंडरपासचा पर्याय आहे. काम जानेवारी महिन्यात पूर्ण करण्याच्या आश्वासन प्रशासनाने दिले आहे. पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांना बोलावून डेडलाईनचे स्मरण करून दिले आहे.

नाशिककरांना होणारा त्रास लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण होण्यासाठी दिलेली कालमर्यादा पाळली जावी. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी हजर रहावे. वेळेत कामे न झाल्यास गंभीर दखल घेण्यात येईल असा इशारा भुजबळांनी अभियंत्यांना कार्यालयात बोलवून दिला आहे.

Minister Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : आमदार सुहास कांदेंना येवल्यातून लढण्याची इच्छा, भुजबळांनी एकाच शब्दात विषय संपवला

छगन भुजबळ नाशिकचे प्रदीर्घकाळ पालकमंत्री राहिले आहेत. त्यामुळे प्रशासनावर अद्यापही त्यांचा वचक आहे. याबाबत त्यांनी विधिमंडळात देखील नाशिककरांच्या व्यथा मांडल्या होत्या. वाहतूक कोंडीवर त्यांनी थेट अधिकाऱ्यांना तंबी दिल्याने तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून कंत्राटदारांना सूचना देऊ नये. नाशिक ते इगतपुरी दरम्यान प्रत्यक्ष प्रवास करून महामार्गाची स्थिती जाणून घ्यावी. जिथे जिथे कामे सुरू आहेत तिथे पर्यायी मार्ग सुरळीत व सुस्थितीत असेल याची दक्षता घ्यावी. संदर्भात नियमितपणे रस्त्याने प्रवास करावा असा सल्लाही भुजबळ यांनी अभियंत्यांना दिल्याने यंत्रणा हलू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.