Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा मोठा विचार होणार; राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक विधान

NCP Leader Big Statement : तो भुजबळ यांचा विचार आहे, पण आम्हाला जे जाणवतं, त्यानुसार भुजबळ यांना ते सोडणार नाहीत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीची विनंती आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना करणार आहोत.
Narhari Zirwal-Ajit Pawar-Chhagan Bhujbal
Narhari Zirwal-Ajit Pawar-Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 17 December : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तडकाफडकी नागपूर सोडून नाशिक गाठले आहे. राज्यभरातून आलेल्या समर्थकांना ते नाशिकमध्ये भेटत आहेत. अजित पवारांची साथ सोडण्यासाठी ते भुजबळांवर दबाव आणत आहेत. भुजबळांनीही तसे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी भुजबळ यांना मिळणाऱ्या पदाबाबत थेट भाष्य केले आहे, त्यामुळे आता भुजबळांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांना स्थान न मिळाल्याने राज्यातील ओबीसी समाजातून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनही केले जात आहे. खुद्द भुजबळ यांनीही हिवाळी अधिवेशन सोडून थेट नाशिक गाठले आहे. नाशिक भुजबळांना भेटण्यासाठी राज्यभरातील ओबीसी नेते येत आहेत. आजच त्यांची नाशिकमध्ये बैठकही झाली आहे. त्यात भुजबळांनी अजित पवारांची साथ सोडावी, अशी भूमिका मांडली आहे. मात्र, भुजबळांनी अजूनही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भुजबळांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दुसरीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाशिक जिल्ह्यातील आदिवासी नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, छगन भुजबळ हे सिनियर नेते आहेत, त्यामुळे गोंधळ आणि त्या गोंधळाचा परिणाम जिल्ह्यावर, मतदारसंघावर अथवा सर्वसामान्य जनतेवर होईल, असे ते काहीही करणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे.

छगन भुजबळ यांच्यावर अन्याय झाला आहे, असं म्हणण्यापेक्षा त्यांच्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर काय ठरलं आहे, त्यांच्यात काय चर्चा झाली आहे, हे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला माहिती नाही, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले. मी स्वतः भुजबळ यांना भेटून आलो आहे.

Narhari Zirwal-Ajit Pawar-Chhagan Bhujbal
Vidhan Parishad Speaker : भाजप शिवसेनेला आणखी एक धक्का देणार?; विधान परिषदेचा सभापती होणार फडणवीसांच्या मर्जीतील नेता!

झिरवाळ म्हणाले, छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसला गरज होती, असं म्हणता येणार नाही. त्यांनी पक्षाला मागंही गरज होती, आजही आणि भविष्यकाळातही कायम राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा योग्य विचार होईल, असं मला तरी वाटतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तिघेच निर्णय घेतात. आम्हाला लाभ आणि कशाचं बळ, असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. त्यावर तो भुजबळ यांचा विचार आहे, पण आम्हाला जे जाणवतं, त्यानुसार भुजबळ यांना ते सोडणार नाहीत. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीची विनंती आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना करणार आहोत, असेही झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

Narhari Zirwal-Ajit Pawar-Chhagan Bhujbal
Sushma Andhare : ‘गृह खात्याने माणसं पेरली आहेत, कोरेगाव भीमा दंगलीवेळी असणारे पोलिस अधिकारी परभणीत’

झिरवाळ म्हणाले, पहिल्याच फेजला जर छगन भुजबळ यांना थांबवलं आहे, तर कदाचित यापेक्षा पुढं काही मोठं होणार असेल, त्यांना मोठं काही करणार असतील, असा विचार करूनही भुजबळ यांना थांबवलं असेल, असा मी तरी विचार करतो. नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यामुळे माझं तिकिट कापलं, असं छगन भुजबळ तरी बोलणार नाहीत, असे मला विश्वास वाटतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com