Eknath Shinde: मालेगाव जिल्हानिर्मितीवरून शिंदे गटात मतभेद

आमदार सुहास कांदे यांचे कानावर हात; साडेतीन दशकांपासून सुरु आहेत राजकीय प्रयत्न.
MLA Suhas Kande
MLA Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : माजी कृषीमंत्री दादा भूसे (Dada Bhuse) मालेगाव जिल्हा (Malegaon District) निर्मितीसाठी प्रयत्नशील असताना त्यांच्याच गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas kande)यांनी यासंदर्भात तटस्थ भूमिका घेत काहीही बोलण्यास नकार देताना कानावर हात ठेवले आहे. यावरून शिंदे गटात मतभेद तर नसावेना या अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. दुसरीकडे कळवणचे आमदार नितीन पवार (Nitin Pawar) यांनी मालेगाव जिल्हा निर्मितीत कळवण तालुक्याच्या सहभागाला विरोध दर्शविला आहे. (Political disputes on Eknath Shonde`s Malegaon District announcement)

MLA Suhas Kande
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यात शिवसेनेला पोलिसांच्या नोटीस!

नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव जिल्हानिर्मितीसाठी जवळपास साडेतीन दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु मालेगावकरांना जिल्हा हवा असला तरी मालेगाव जिल्ह्यात सहभागी होण्यासाठी इतर तालुके तयार नाहीत. विशेष करून यापूर्वी चांदवड, नांदगाव तालुक्यांतील नागरिकांनी विरोध केला आहे. जिल्हानिर्मितीचा नारळ फुटण्यापूर्वींच वाद निर्माण होऊन विषय बारगळायचा. परंतु आता पुन्हा मालेगाव जिल्हानिर्मितीचा विषय चर्चेला आला आहे. महाविकास आघाडीला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह स्वतंत्र चूल मांडली व भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली.

MLA Suhas Kande
Sharad Pawar: आमचं संघटन खिळखिळं झालं की काय, ते निवडणुकीत दिसेल!

मुख्यमंत्री होत असताना शिंदे यांनी त्यांच्या सोबत आलेल्या चाळीस आमदारांचे मतदारसंघ भक्कम करण्यासाठी त्यांच्या भागाचे दौरे सुरू केले आहेत. दादा भुसे व सुहास कांदे हे शिंदे यांच्या सोबत गेल्याने ३० जुलैला मालेगावमध्ये विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मालेगावमध्ये प्रथमच बैठक होत असल्याने उत्सुकता आहे. यानिमित्ताने दादा भुसे यांची मतदारांसमोर बाजू मांडताना त्यांचा गड भक्कम करण्याचे प्रयत्न आहेत. एकीकडे बैठक आयोजित करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मालेगाव जिल्हानिर्मितीचा मुद्दा चर्चेला आणताना प्रशासनाला तसे आदेशित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रस्ताव मांडताना मालेगाव जिल्ह्यात मालेगावसह नांदगाव, सटाणा, देवळा, चांदवड, कळवण या तालुक्यांचा समावेश केला आहे. मालेगाव जिल्हा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याशिवाय मनमाड, नामपूर हे दोन तालुके मालेगाव जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आले.

समावेशावरून मतभेद

मालेगाव जिल्ह्यात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा की नाही, यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना विचारण्यात आले. त्या वेळी त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. यावरून जिल्हानिर्मितीवरून शिंदे गटात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

...

मालेगाव जिल्ह्यात सहभागी व्हायचे की नाही यासंदर्भात नांदगावमधून मला कोणाचा फोन आला नाही. मालेगाव जिल्ह्यात सहभागी होण्यासाठी किंवा न होण्यासाठीदेखील मला कोणी बोलले नाही. जिल्हानिर्मितीला कोणी विरोध देखील केला नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. पहिल्यांदाच आमदार झालो आहे. त्यामुळे अशा गोष्टी मला माहीत नाही.

-सुहास कांदे, आमदार, नांदगाव विधानसभा मतदारसंघ

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com