भाजपमध्ये फूट : दोन गट आले आमनेसामने अन् जुंपली

महासभेत भाजप आणि भाजपच्या फुटीर गटात, गटनेते पदावरून गदारोळ झाला.
Jalgaon Municipal Corporation meeting
Jalgaon Municipal Corporation meetingsarkarnama
Published on
Updated on

जळगाव : जळगाव महापालिकेची विशेष महासभा बुधवारी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षातील फुटीर गटाने गटनेते पदाचा दावा केला तर भाजपने (BJP) त्याला विरोध करीत मतदान घेण्याची मागणी केली. त्यामुळे सभेमध्ये गदारोळ झाला आणि पिठासीन अध्यक्ष महापौर जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांनी महासभा तहकूब करण्याची घोषणा केली.

स्थायी समिती सदस्य निवड व स्वीकृत सदस्य निवड असे विषय होते. मात्र, सुरवातीलाच भाजपच्या गटनेते पदावरून वाद सुरू झाला. गेल्या चार महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे २९ नगरसेवक फुटले होते. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला आणि गटनेतेपदी दिलीप पोकळे यांची निवड केली होती. भाजपने अधिकृत गट आपलाच असल्याचा त्यांनी दावा केला आहे. मात्र, भाजपने विभागीय आयुक्तांकडे माहिती अधिकारात अर्ज दाखल करून माहिती घेतली असता सद्य परिस्थिती भाजप गटनेते भगत बालानी हेच असल्याची माहिती दिली. त्या नुसार भाजपने महापालिकेच्या महापौरांना पुराव्यासह माहिती देवून फुटीर गटाचा दावा चुकीचा असल्याचे सांगत त्याच्या गटनेते पदाला मान्यता देवू नये असे सांगितले.

Jalgaon Municipal Corporation meeting
हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागते...यावर शरद पवार म्हणतात...

महासभेत भाजप आणि भाजपच्या फुटीर गटात, गटनेते पदावरून गदारोळ झाला. अगोदर गटनेता ठरवा त्यानंतर स्वीकृत सदस्य निवड करा, असे मत भाजपचे गटनेते भगत बालानी, कैलास सोनवणे यांनी मांडले. मात्र, त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला आणि महाजन यांनी सभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.

Jalgaon Municipal Corporation meeting
खुद्द पवारांचाच वानखेडेंवर हल्ला... त्यांची कोणाशी संगत आहे, याचा संशय येतोय!

कावडीयांच्या आनंदावर विरजण

शिवसेनेचे नामनिर्देशित झालेले स्वीकृत नगरसेवक विराज कावडीया यांच्या नगरसेवक पदाची आज अधिकृत घोषणा होणार होती, त्या मुळे त्यांनी महापालिकेसमोर रांगोळी काढली होती. संपूर्ण परिसर भगवामय केला होता. अगदी ढोल ताशे ही आणले होते. मात्र, त्यांच्या निवडीची घोषणा न झाल्याने त्यांच्या आनदावर विरजण पडले, ढोल ताशे न वाजताच परत गेले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com