

Balasaheb Thorat attacks BJP over SIR : SIRच्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधारी भाजपला आंदोलनात सहभागी होण्याचीच ऑफर दिली. भाजपला लोकशाही आणि संविधान हवे असेल, तर त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे, असे थोरात म्हणाले.
SIRच्या निर्णयावरून निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भूमिकेवर विरोधकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः Form 6 संदर्भातील प्रक्रियेवरून सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावल्याचा उल्लेख करत विरोधकांनी आपली भूमिका आणखी आक्रमक केली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले असताना सत्ताधारी भाजप (BJP) त्यांची बाजू का घेत आहे, हे समजत नाही. ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत सर्वोच्च न्यायालयातील घडामोडींनंतरही भाजपकडून त्यांना पाठिंबा दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपला लोकशाही आणि संविधान हवे असेल, तर त्यांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावे. मात्र, भाजपला कोणत्याही पद्धतीने सत्तेवर राहायचे आहे, असा आरोपही थोरात यांनी केला.
ज्ञानेश कुमार यांची भाजपकडून घेतली जाणारी बाजू म्हणजे त्यांचा लोकशाहीविरोधात वापर केला जात असल्याचे संकेत आहेत, असा गंभीर आरोप थोरात यांनी केला. SIRच्या प्रक्रियेदरम्यान Form 6 संदर्भातील बदलांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. Form 6 बाबतचे बदल योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असा दावा थोरात यांनी केला. या प्रकरणात कारवाईचे निर्देश मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र तसे निर्देश झाले नसल्याचेही त्यांनी म्हटले.
SIRच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य विरोधकांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. मतदार यादीतील बदल, मतदारांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकार तसेच निवडणूक आयोगाला लक्ष्य करत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. लोकशाही आणि संविधानावर विश्वास असेल, तर भाजपनेही आमच्यासोबत आंदोलनात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.