Maharashtra Drought Politics : दुजाभाव नको, राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा!

Congress Deemands to Maharashtra Government on Drough Politics-काँग्रेस पक्षाने राज्यातील दुष्काळी स्थिती स्पष्ट असताना राज्य शासन जनतेला दिलासा का देत नाही, असा प्रश्न केला.
Congress Delegation at Nashik
Congress Delegation at NashikSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics : राज्य शासनाने नुकतीच दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात मोठा विरोधाभास आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांवर अन्याय झालेला असल्याने राज्य शासनाने सरसकट सबंध राज्यात दुष्काळ जाहीर करावा. (Congress delegation deemands Administration Shall given relief to Farmers)

महाराष्ट्रात (Maharashtra) सर्व जिल्ह्यात (Nashik) पुरेसा पाऊस (Water) झालेला नाही. त्याचा ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी सर्व घटकांवर विपरीत परिणाम झालेला आहे. राज्य शासनाने त्याची दखल घ्यावी.

Congress Delegation at Nashik
Marathwada Water Issue : जायकवाडीचे पाणी पेटणार; भाजप आमदारानेच फुंकले रणशिंग!

राज्यात सगळीकडे सध्या दुष्काळाच्या परिस्थितीची चर्चा होत आहे. याबाबत विरोधी पक्ष आणि राज्य शासन यांच्यात परस्परांवर दोषारोप केले जात आहेत. त्यादृष्टीने राज्य शासनाने यावर योग्य तोडगा काढावा. दुष्काळाचा मोठा फटका विविध घटकांना बसल्याने काँग्रेस पक्षाने याबाबत राज्य शासनाला इशारा दिला आहे.

राज्यामध्ये यंदा पाऊस कमी झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय गंभीर स्थिती आहे. या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांकडे असलेलं पशुधन कसे सांभाळावे याची मोठी चिंता आहे. जनावरांना पाणी, चारा मिळणं कठीण झालं आहे. पिके हातची गेली आहे. अस्मानी संकट असतानाच महागाईचादेखील मोठा फटका बसत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरहीदेखील त्याचा परिणाम होणार आहे.

सावकाराच्या कर्जाखाली दबलेला शेतकरी एकीकडे आणि रुसलेला पाऊस या मोठ्या संकटाला तोंड देण्याची वेळ सबंध राज्यातील जनतेवर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुके अतिशय तीव्र दुष्काळाचा सामना करीत आहेत. राज्यात सरासरी ६० ते ७० टक्के पाऊस झालेला असल्याने सबंध राज्यात दुष्काळ जाहीर करावा. त्याचा नागरिकांना दिलासा मिळेल, अशी मागणी शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने करण्यात आली आहे. वसंत ठाकूर यांसह जयेश पोकळे, धोंडीराम बोडके, सिद्धार्थ गांगुर्डे, अनिल बेग, चारुलताताई शिरोडे, नंदकुमार येवलेकर, जगदीश वर्मा, चंद्रकांत निर्वाण आदींसह विविध पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Congress Delegation at Nashik
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या डेडलाइनवर घोळ; 24 डिसेंबर की 2 जानेवारी? जरांगे म्हणतात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.