Digvijaya Singh News : 'RSS धर्माच्या नावावर लोकांच्या मनात विष भरतय, जे विष बाटलीत बंद होतं ते..' ; दिग्विजय सिंह यांचा आरोप!

Digvijaya Singh on Election Commission : 'या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम केलं ते...' असंही विधान दिग्विजय सिंह यांनी यावेळी म्हटलं
Digvijaya Singh
Digvijaya SinghSarkarnama
Published on
Updated on

Digvijaya Singh at Srirampur News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) धर्माच्या नावावर लोकांच्या मनात विष भरत आहे. विष बाटलीत बंद होते ते आता बाटलीच्या बाहेर निघाले आहे, आता ते बाटलीत परत टाकण सोपं नाही. असं गंभीर आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

अहमदनगरमधील श्रीरामपूरचे माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे स्मृती पुरस्कारांचे वितरण काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंग(Digvijaya Singh) आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्रीरामपूर येथए बुधवारी झाले. यावेळी शेती, उद्योग, व्यवसाय, सहकार तसेच प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगीरी करणा-या व्यक्तीतींना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Digvijaya Singh
Nana Patole : विशाळगड हिंसाचारावरुन नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा, 'गृहमंत्री दंगेखोरांना...'

याप्रसंगी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्रातील राजकारणासह विविध मुद्य्यांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आरएसएस'चे लोकं चतुराईने लोकांच्या डोक्यात आपली विचारधारा भरतात. आरएसएसचा माईंड गेम आपण समजून घेतला पाहिजे. त्यानंतरच आपण त्यांच्याशी लढू शकतो. तसेच, राजकारण हे पहिलवानी नाही, विचारानेच लढलं पाहिजे, असंही त्यांनी युवकांना सांगितलं.

याशिवाय, 'आरएसएस(RSS) अनेक लोकांना समजला नाही आरएसएस धर्माच्या आधारावर देश वाटू पाहत आहे. धर्माच्या आधारावर देशवासियांच्या मनात आणि डोक्यात विष भरत आहेत. जे विष बाटलीत बंद होते ते आता बाटलीच्या बाहेर निघाले आहे. आता ते बाटलीत परत टाकण सोपं नाही.' असं म्हणत त्यांनी संघावर टीकाही केली.

Digvijaya Singh
Congress News : काँग्रेस फुटीर आमदारांवर खरंच कारवाई करणार की पुन्हा अभय?

तर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, 'दुर्दैवाने महाराष्ट्रात ज्या पध्द्तीने सरकार पाडलं गेलं, पक्ष फोडले गेले हे सर्व मर्यादा सोडून केलं गेलं हे योग्य नाही. ज्यांनी जनतेला धोका देऊन सरकार पाडलं त्यांना माफी नाही.

याचबरोबर राजगड लोकसभा मतदारसंघातील पराभवाबद्दल बोलताना दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, 'माझी लढाई ईव्हीएम सोबत आहे. ईव्हीएमद्वारे मतदान घेऊ नये हे मीच नाही तर एलन मस्क देखील सांगत आहेत. आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात पृथ्वीवरून चंद्रावर सुध्दा गाडी चालू शकतो तर सगळं काही होऊ शकत. विकसित देश सुद्धा ईव्हीएम सोडून बॅलेट पेपरवर आले आहेत. मतमोजणीची खात्री करणं हा आमचा अधिकार आहे. लोकशाहीत निष्पक्ष निवडणुका अपेक्षित आहेत. या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम केलं ते संशयास्पद आहे.'

Digvijaya Singh
Nilesh Lanke On Sujay Vikhe : विखेंचा 'तो' बालिशपणा ठरेल; खासदार लंकेंचा टोला

जम्मू काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना दिग्विजय सिंह यांनी 'काश्मीरच्या समस्येबद्दल अटल बिहारी वाजपेयी यांनी तीन बिंदू सांगितले होते. काश्मीरच्या लोकांना विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे. काश्मिरीयत, लोकशाही आणि माणुसकी या तिन्ही बिंदूंच पालन केलं असतं तर तोडगा निघाला असता. परंतु नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी ते केलं नाही.' असंही यावेळी सांगितलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com