Prithviraj Chavan on Viksit Bharat : मोदींच्या ‘विकसित भारता’वर पृथ्वीराज चव्हाणांचे प्रश्न; GDPवर का मौन?

Prithviraj Chavan questions PM Narendra Modi Viksit Bharat claim over GDP and per capita income : दरडोई उत्पन्नात भारताचा 162 वा क्रमांक असल्याचा दावा; विकसित राष्ट्र होण्यासाठी किमान 40 वर्षे लागतील, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे
Prithviraj Chavan
Prithviraj ChavanSarkarnama
Published on
Updated on

India GDP growth : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचे समर्थक विश्वगुरू संबोधतात. भारत विकसित राष्ट्र होण्याबाबत भाजप दावा करीत आली आहे. विषयी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.

श्री चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासार्हतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधान मोदी विविध दावे करतात. आयुष्याच्या जीडीपी विषयावर ते का मौन आहेत.

देशाची अर्थव्यवस्था मोजण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे जीडीपी असतो. मात्र पंतप्रधान मोदी (Narendra Modi) याबाबत पुरेसे बोलत नाहीत. याविषयी उकल करून काहीही सांगत नाहीत. त्यामुळे विकसित भारत हे दिवा स्वप्न ठरणार आहे.

काँग्रेस (Congress) पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक 162 वा आहे. भारतापेक्षा 161 देश अधिक समृद्ध आहेत. भारताला विकसित व्हायचे असेल तर किमान 88 वा क्रमांक प्राप्त करावा लागेल. त्यासाठी किमान 40 वर्षे लागतील. मात्र मोदी है तो मुमकिन है यामुळे कदाचित पंतप्रधान मोदी ते आधीच साध्य करतील, असा चिमटा चव्हाण यांनी घेतला.

Prithviraj Chavan
RSS Mohan Bhagwat : मोहन भागवतांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी USCIRFची RSSविरोधात मोठी मागणी; राजनैतिक सन्मान न देणे अन् उच्चस्तरीय बैठका टाळा, भारत-अमेरिका संबंधांत नवा वाद

आपल्या देशावर आपले प्रेम असेल तर प्रत्येक नागरिकाने या गंभीर प्रश्नाची दखल घेतली पाहिजे. राज्य सरकारला प्रत्येक नागरिकांनी जीडीपी बाबत जाब विचारण्याची गरज आहे. त्याशिवाय सरकारला त्याचे गांभीर्य उमगणार नाही.

Prithviraj Chavan
Cooperative Bank Election Maharashtra : 10 वर्षे संचालक राहिल्याने अपात्र नाही? सहकारी बँकांच्या निवडणुकांबाबत मोठा निर्णय

त्या देशाचा जीडीपी सरासरी सहा टक्के आहे. विकसित देश होण्यासाठी किमान सात ते आठ टक्क्यांपर्यंत तो गेला पाहिजे. तसे नसताना भारताला विकसित म्हणणे किंवा विश्वगुरू यांसारखे शब्द वापरणे योग्य नाही.

भारतीय संस्था मांडत असलेल्या आकडेवारी विषयी त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताच्या आकडेवारीला जागतिक स्तरावर सी ग्रेड संबोधले जाते. त्यामुळे ती विश्वासार्ह नाही. याउलट मी केलेले विधान जागतिक बँकेने जाहीर केलेले आकडेवारी वर आधारित असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com