Dada Bhuse Politics: अद्वय हिरे, दादा भुसे ॲक्टिव्ह मोडवर, मंत्री भुसे पहाटेच धडकतात कार्यकर्त्यांच्या घरी!

Dada Bhuse; Minister Bhuse & Adway Hire active in Malegaon, Political Competition-मालेगाव बाह्य मतदार संघात यंदाची निवडणूक रंगतदार असल्याने राजकारण अतिशय चुरशीचे झाले आहे.
Adway hire & Dada Bhuse
Adway hire & Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Bhuse Vs Hire: मालेगाव बाह्य मतदारसंघाची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार आहे. त्याचे संकेत आत्ताच मिळू लागले आहेत. या मतदारसंघात तिन्ही संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरवात केली आहे.

शिवसेना मुख्यमंत्री शिंदे पक्षाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे जमिनीवरचे राजकारण करण्यात तरबेज आहेत. त्याची जाणीव त्यांनी आपल्या विरोधकांना पुन्हा एकदा करून दिली आहे. सध्या मंत्री भुसे थेट विरोधकांच्या छावणीत फिरत आहेत.

गाव पातळीवर निवडणूक हाकणाऱ्या प्रतिस्पर्धी नेत्यांच्या कार्यकर्त्यांना ते भेटत आहेत. त्यांचा हा दौरा पहाटे पाचलाच सुरू होतो. कार्यकर्त्यांना ते झोपेतूनच उठवतात. रोज विविध गावांमध्ये त्यांचे हे दौरे सुरू झाले आहेत.

पालकमंत्री भुसे यांना यंदा राजकीय चुरस आणि निवडणुकीचे गांभीर्य दोन्हींची चाहूल लागली आहे. विरोधक प्रबळ झाल्याने मतदारसंघात सध्या विरोधकांच्याच कार्यकर्त्यांना आपलेसे करण्यात पालकमंत्री व्यस्त आहेत.

Adway hire & Dada Bhuse
Ramdas Athavale Politics: अजित पवार यांच्या दौऱ्याआधीच रामदास आठवलेंची गुगली, केला देवळालीवर दावा!

या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वय हिरे हेच शिवसेनेचे पुढचे आमदार असतील असे जाहीर केले.

उपनेते हिरे यांनी देखील आपल्या नेहमीच्या हाय फाय स्टाईल मध्ये बेरजेचे राजकारण आणि मतदार संघात संपर्क सुरू केला आहे. त्यांचा सर्व भर प्रामुख्याने पालकमंत्र्यांच्या कामकाजावर आणि गैरव्यवहारांची चर्चा घडवण्यावर आहे.

पालकमंत्री भुसे हे सुडाचे राजकारण करतात. हा प्रचार मतदारांवर बिंबवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार भुसे यांना हे वातावरण बदलण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागत आहेत.

Adway hire & Dada Bhuse
BJP Politics: भाजप आमदार तणावात; हरियाणा पॅटर्न म्हणजे आहे तरी काय?

बारा बलुतेदार संघटनेचे नेते बंडू काका बच्छाव यांनी देखील आपण उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी विविध सामाजिक घटकांना जवळ करण्याचे काम सुरू केले आहे. त्यात प्रामुख्याने मुस्लिम आणि दलित समाजाला आपल्याकडे वळविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.

हे दोन्ही घटक मालेगाव बाह्य मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. सध्या विद्यमान आमदार भुसे यांचे विरोधक श्री हिरे आणि श्री बच्छाव असे तिघेही जोमाने कामाला लागले आहेत. त्यांची प्रचार वाहने फिरत आहेत.

तिरंगी लढत टाळण्यासाठी कोण पुढाकार घेतो. कोणाची समजूत घालण्यात कोणाला यश मिळते. यावर मालेगाव बाह्य मतदारसंघाचे राजकारण आणि निवडणुकीची दिशा ठरणार आहे. एकंदरच नेत्यांमधील स्पर्धेमुळे कार्यकर्त्यांचा भाव वाढला आहे. तो आणखी वधारत जाईल अशी स्थिती आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com